Home /News /lifestyle /

केवळ अतिखाण्यानेच नव्हे तर जास्त पाणी पिण्याने आणि कमी खाण्यानेही वाढतं वजन

केवळ अतिखाण्यानेच नव्हे तर जास्त पाणी पिण्याने आणि कमी खाण्यानेही वाढतं वजन

वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं.

वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं.

Weight Loss चा प्रयत्न करत असलात तर आधी हे वाचा. कमी खाऊन, भूक मारून किंवा अति पाणी पिण्याने वजन कमी होत नाही, उलट वाढतं. वजन वाढण्याची ही 8 कारणं जाणून घ्या.

नवी दिल्ली, 25 जून: हल्ली वजन वाढण्याच्या (Weight gain) बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात आणि जास्त जेवणामुळे वजन वाढत असा आपला सर्वसाधारण समज असतो. मात्र, वजन वाढणं किंवा लठ्ठपणा (obesity) केवळ जास्त खाण्यामुळे येत नाही. तर त्यासाठी इतर बरीच कारणं असतात. ही कारणं माहिती नसताना आपण वजन कमी करण्याचा (weight loss) प्रयत्न केल्यास रिझल्ट्स तेवढे प्रभावी नसतात. कमी झालेलं वजन अगदी काही दिवसांत पुन्हा वाढतं. वाढत्या वयानुसार पुरुष आणि स्त्रियांमध्ये हॉर्मोनल बदल होतात आणि त्याचा परिणाम शरीरावरही होतो. अशा परिस्थितीत वजन वाढतं. तसेच पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होण्यास सुरुवात होते. स्त्रियांमध्ये त्याचा परिणाम स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. TV9 ने यासंदर्भात लेख दिला आहे. पचनक्रिया हे दुसरं कारण आहे. काही कारणामुळे पचनसंस्थेवर परिणाम झाला तरी खाल्लेच्या अन्नाचं चरबीत रुपांतर व्हायचं प्रमाण वाढतं. ज्या लोकांची पाचक यंत्रणा कमकुवत असते. त्यांना जेवण पचत नाही आणि ते शरीरात चरबीच्या रूपात साठवले जाते. वयानुसार पोट वाढण्याची प्रकरणं आपण पाहिली असतील. याचं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार पाचक प्रणाली कमजोर होते. अशात जर दुर्लक्ष केलं तर चरबी वाढून पोट बाहेर येतं. त्यामुळे जर तुम्हाला लठ्ठपणा नियंत्रित करायचा असेल तर तुमची पाचक यंत्रणा निरोगी ठेवा. Pregnant महिलांनाही कोरोना लस द्या; मोदी सरकारने जारी केल्या गाइडलाइन्स काही लोकांमध्ये लठ्ठपणा हा अनुवांशिक कारणांमुळे होतो. मात्र तो कंट्रोल केला जाऊ शकत नाही, असं नाही. यासाठी फक्त तुम्हाला योग्य डाएट आणि फिजिकल अक्टिव्हिटी कायम करणं गरजेचं आहे. तणावामुळे वजन वाढतं, हे तुम्हाला माहितच असेल. त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि नियमित मेडिटेशन करा.  कोणत्याही आजारामुळे किंवा औषधांमुळे वजन वाढू शकते. परंतु व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्यास ते नियंत्रित करता येतं. पाण्यामुळेही वाढतं वजन जेवताना जास्त पाणी प्यायल्याने पोट वाढतं. कारण पाण्यामुळे पाचनक्रिया मंदावते. त्यामुळे जास्त पाणी पिणं टाळावं. पचनक्रिया योग्यरित्या न झाल्यास चरबी पोटामध्ये जमा होते. त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. तसेच जेवणाच्या एक तासानंतर कोमट पाणी प्यावं, त्यामुळे जेवण पचवण्यास मदत होते. Weight Loss कमी करण्याचा सोपा उपाय; फक्त सकाळच्या काही सवयी बदला ज्या लोकांचं जास्तीत जास्त काम हे बसून करण्याचं असतं. त्यांच्या शारीरिक हालचाली पूर्णपणे मंदावतात. सतत बसून राहिल्यामुळे त्यांच्या पोटाजवळ आणि कमरेजवळ चरबी जमा होते. म्हणून नियमित व्यायामाची सवय लावणं गरजेचं आहे. कमी जेवलात तरी वाढेल वजन बऱ्याचदा कामामुळे आपण जेवण स्कीप करतो. जेव्हा भूक लागते तेव्हा आपण काहीतही हलके फुल्के पदार्थ खातो. या सवयींमुळे शरीराला योग्य पोषक तत्व मिळत नाहीत आणि वजन वाढते. त्यामुळे वेळेवर खाण्याची सवय लावा आणि आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
First published:

पुढील बातम्या