• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • पांढऱ्या मधाचा उपयोग औषधांच्या निर्मितीसाठी, जाणून घ्या त्याचे फायदे

पांढऱ्या मधाचा उपयोग औषधांच्या निर्मितीसाठी, जाणून घ्या त्याचे फायदे

White Honey Benefits: अनेक ठिकाणी मधाचा उपयोग होतो. प्रकृती चांगली राखण्यासाठी आहारात मधाचा समावेश असणं चांगलं असतं. पण आपण नेहमी जो मध वापरतो किंवा सर्रास जे मध पाहतो, तो तपकिरी रंगाचं असते.

  • Share this:
 नवी दिल्ली, 31 जुलै:  मध कोणाला आवडत नाही बरं? नैवेद्याच्या पंचामृतापासून आयुर्वेदिक औषधांपर्यंत अनेक ठिकाणी मधाचा उपयोग होतो. प्रकृती चांगली राखण्यासाठी आहारात मधाचा समावेश असणं चांगलं असतं. पण आपण नेहमी जो मध वापरतो किंवा सर्रास जे मध पाहतो, तो तपकिरी रंगाचं असते. पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचं मध (White Honey) चाखलं आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटलं, तरी पांढरा मधही असतो. पांढऱ्या रंगाचा मध कच्चा मध म्हणून ओळखला जातो. 'हेल्थलाइन'मध्ये दिलेल्या माहितीनुसार पांढऱ्या मधाचा उपयोग औषधांच्या निर्मितीत, तसंच आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात केला जातो. हा मध अल्फाल्फा, फायरवेड अशा काही झाडांच्या फुलांपासून मिळतो. पांढरा मध (White Honey) हा एक वैशिष्ट्यपूर्ण मध असून, सर्वसाधारण मधाच्या तुलनेत अधिक पौष्टिक गुणांनी (Benefits) परिपूर्ण असतो. या मधाचे काय फायदे (White Honey Amazing Benefits ) आहेत, हे जाणून घेऊ या. अँटीऑक्सिडंट्सचं पॉवरहाउस पांढऱ्या मधाला अँटीऑक्सिडंट्सचं पॉवरहाउस म्हटलं जातं. कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी अनेक पोषक तत्त्वं असतात. फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉलिक ही द्रव्यं अँटीऑक्सिडंट्सच्या गुणांनी समृद्ध असतात. हा मध खाल्ल्यामुळे वृद्धत्व लांबवता येतं. तसंच आपल्या हृदयाचं (Heart) आरोग्य चांगलं राखलं जातं. खोकल्यापासून आराम खोकल्यापासून त्रास होत असेल, तर पांढऱ्या मधामुळे खूप फायदा होतो. पाणी उकळून त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि पांढरा मध घालून ते प्याल्यास खोकल्यापासून आराम पडतो. सतत खोकल्याचा त्रास होणाऱ्यांना या मधाचा फायदा होईल.

प्रेग्नेन्सीत निष्काळजीपणा नको; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला

पचनक्रिया सुधारण्यास मदत पोटाच्या अल्सरसारख्या समस्यांमध्ये पांढरा मध हा खूप लाभदायक ठरतो. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठीदेखील याची मदत होते. त्यासाठी दररोज एक चमचा पांढरा मध सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा, अशी शिफारस केली जाते. तोंड आल्यानंतर उपयोगी तोंड आलं असेल (Mouth Ulcers) तर पांढऱ्या मधाचं सेवन करावं. त्यामुळे तोंडामधल्या अल्सरपासून आराम मिळतो. जेथे तोंड आलं आहे, तेथे पांढरा मध लावावा. सातत्यानं तोंड येण्याची समस्या असणाऱ्या व्यक्तीला यामुळे आराम मिळेल.

त्वचेवर ‘ही’ 3 लक्षणं दिसताच तपासा Blood Sugar; हालचाल करणंही होईल कठीण

अशक्तपणाची समस्या दूर होण्यास मदत हा पांढरा मध रोज कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढतं. याचं सेवन केल्याने महिलांना अशक्तपणासारख्या समस्येला तोंड द्यावं लागत नाही.
Published by:Pooja Vichare
First published: