Home /News /money /

महत्त्वाची बातमी! वाहनाच्या PUC कडे अजिबात दुर्लक्ष करू नका; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

महत्त्वाची बातमी! वाहनाच्या PUC कडे अजिबात दुर्लक्ष करू नका; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

या नवीन नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 31 जुलै : दुचाकी (Two Wheeler) आणि चारचाकी (Four Wheeler) वाहनचालकांना आता Pollution under Control Certificate कडे (PUC) दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय PUC देशपातळीवर एकसारखं करण्याबद्दल कार्यरत आहे. वाहनचालकाकडे PUC सर्टिफिकेट नसेल तर वाहनाची नोंदणी अर्थात रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) रद्द करण्यात येईल. त्यासोबतच मोठा दंडसुद्धा आकारला जाईल. या नवीन नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वाहनांसाठी PUC का आवश्यक आहे? जेव्हा एखादं वाहन प्रदूषण नियंत्रण नियमांची पूर्तता करतं, तेव्हाच वाहनमालकाला PUC दिलं जातं. हे सर्टिफिकेट म्हणजे आपलं वाहन प्रदूषण नियमानुसार असल्याचा आणि पर्यावरणाला नुकसान पोहोचवत नसल्याचा पुरावा असतो. प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वाहनांना PUC बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व वाहनांकडे वैध PUC असणं आवश्यक आहे. नवीन वाहनांसाठी PUC सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही; मात्र वाहनाचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर एका वर्षानंतर PUC सर्टिफिकेट घेणं आवश्यक असतं. हे सर्टिफिकेट वेळोवेळी रिन्यू (Renew) करावं लागतं. देशात PUC अनिवार्य होणार? PUC सर्टिफिकेटबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. PUC आता देशभरात सर्व वाहनांसाठी युनिफॉर्म केलं जाईल. तसंच PUC नॅशनल रजिस्टरशी (National Register) लिंकही केलं जाईल. त्यामुळे देशभरात PUC एकसारखं असेल. त्याचबरोबर PUC मध्ये काही नवीन फीचर्स जोडली जातील. यामुळे वाहनमालकांना सर्टिफिकेटचा वापर करण सोयीचं होणार आहे. हे वाचा - ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडियामध्ये 8वी पास उमेदवारांसाठी भरती PUC नसेल तर इन्शुरन्स मिळणार नाही सुप्रीम कोर्टाच्या (SC) आदेशानुसार, इन्शुरन्स कंपन्यांना वाहन इन्शुरन्स पॉलिसीच्या (Vehicle Insurance Policy) नूतनीकरणाच्या वेळी वैध PUC सर्टिफिकेट असल्याची खात्री करावी लागेल. वाहनांमुळे वाढत असलेल्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करून जुलै 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार, एखाद्याकडे PUC सर्टिफिकेट नसेल तर सर्टिफिकेट इश्यू (Issue) करेपर्यंत वाहन इन्शुरन्स पॉलिसीचं नूतनीकरण करू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. 10 पट दंड आकारला जाणार 1 सप्टेंबर 2019 चा सुधारित मोटार वाहन कायदा दिल्लीमध्ये लागू झाला, तेव्हापासून वैध PUC सर्टिफिकेट नसल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी PUC सर्टिफिकेट नसल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. परंतु सुधारित मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर आता 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. दंडाच्या रक्कमेमध्ये 10 पट वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीमध्ये सुमारे 1,000 PUC केंद्रांमध्ये अचानक PUC सर्टिफिकेट काढण्यासाठी गर्दी झाली होती. परिवहन विभागाने त्या महिन्यात 14 लाख PUC सर्टिफिकेट इश्यू केली होती.
    First published:

    Tags: Insurance, Vehicles

    पुढील बातम्या