Home /News /lifestyle /

लिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं? खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा

लिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं? खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा

कडक लिंबू कधीच खरेदी करू नका

कडक लिंबू कधीच खरेदी करू नका

चांगली रसरशीत लिंब (Lemon) विकत घेणं फार कठीण काम आहे. लिंबात रस (Juice) कमी असेल तर फेकून द्यावे लागतात.

    दिल्ली,31 जुलै : आपण आवडीने बाजारामधून लिंब (Lemon) घेऊन येतो वरुन ताजी,रसाळ वाटणाऱ्या लिंबामधून सरच (Juice) निघत नसेल तर, ती फेकून द्यावी लागतात. कितीतरी प्रकारचे पदार्थ, भाज्या, सरबत यासाठी लिंबू लागतंच. त्याशिवाय लिंबाचे आरोग्यासाठीही बरेच फायदे  (Health Benefits) आहेत. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी (Vitamin C) असतं. जे सौंदर्य आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळेच लिंबांचा वापर पदार्थ आणि होम रेमेडीजमध्ये (Home Remedies) केला जातो. पण, बऱ्याचवेळा बाजारामधून अगदी टवटवीत  (Fresh) आणलेले लिंबू रसाळ नसतात. आतमधून सुकलेले (Dry Inside) निघतात. त्यामुळे लिंब नेमके कशा प्रकारे घ्यावेत हे माहिती असायला हवं. (झटकेदार मिरचीचेही आहेत बरेच फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर खायलाच हवी) रंगावरून ओळखा चांगले लिंबू लिंबू घेताना बऱ्याचदा काही लोक मोठ्या आकाराचे हिरवे किंवा साधारण पिवळ्या रंगाचे खरेदी करतात. अशा रंगाच्या लिंबांमध्ये फार रस नसतो. पूर्ण तयार लिंबांमध्ये चांगला रस असतो. त्यामुळे मोठा लिंबू घेण्यापेक्षा पिकलेला लिंबू घ्यावा. (Weight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी) लिंबू दाबून पहा कडक लिंबू कधीच खरेदी करू नका त्यापेक्षा हाताने लिंबू दाबून पहा. मऊ असेल तरच घ्या. कडक लिंबामधून सर कमी निघतो उलट मऊ लिंबू जास्त रसाळ असतात. कधीही पातळ सालीच लिंबू खरेदी करा. (निरोगी केसांसाठी बदला वाईट सवयी; नाही घ्यावी लागणार कोणतीही Treatment) डाग असलेले लिंबू घेऊ नका डाग दिसत असतील तर, असे लिंबू घेऊ नका. ते लिंबू आतून खराब असतात. त्यांना पाण्यात जास्त काळ ठेवल्याने हे डाग पडलेले असतात. त्यामुळे आतून सडाला सुरूवात झालेली असते. वरून कोरडे वाटले आणि डाग असले तरी, ते आतून बिन रसाचे असतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या