मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काही चुका टाळल्या तरच येईल Facial Glow; ब्युटी पार्लरमध्ये जाण्याआधी वाचाच

काही चुका टाळल्या तरच येईल Facial Glow; ब्युटी पार्लरमध्ये जाण्याआधी वाचाच

ही पेस्ट आपले हात आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित लावा. 20 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. त्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरचे डाग कमी होतील.

ही पेस्ट आपले हात आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित लावा. 20 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. त्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरचे डाग कमी होतील.

फेशियल केल्यानंतर त्वचा सॉफ्ट झालेली असते. त्यामुळे फेशियलनंतर थ्रेडिंग करू नये. छोट्या चुकांमुळे त्वचेचं नुकसान होतं.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 12 ऑगस्ट : श्रावण महिना आता सुरू झालाय म्हणजे सणांची (Festival) लगबगही सुरू झालीय. आता नारळी पौर्णिमा, रक्षाबंधंन मग गणपती येतील वर्षभराच्या सणांची सुरूवात श्रावण महिन्यांपासूनच होते. त्यामुळे नटण्याथटण्याचे दिवस सुरू झालेत असंही म्हणता येईल. त्यामुळेच मुली आणि महिला त्वचेची जास्तच काळजी (Skin Care) घेत असतील. सणासाठी सुंदर तयार झाल्यावर एखादा पिंपल किंवा डाग (Pimples or Blemishes) दिसत असेल तर, सारखं लक्ष तिकडेच जातं त्यामुळे पार्लरमध्ये(Parlor)जाऊन फेशियल किंवा ब्लिच (Facial or Bleach) करायचा विचार करत असाल तर,आधी ही माहिती वाचा. कधीकधी फेशियल किंवा ब्लिच केल्यानंतर आपल्याकडून अशा काही चुका होतात की चेहरा उजण्याऐवजी काळवडंतो.

1.  फेशियलनंतर मुली किंवा महिला ही चूक करतातच. फेशियलनंतर उन्हात जाऊ नये असा सल्ला ब्यटिशयनही देतात. अगदी पार्लरमधून घरी जातानाही चेहऱ्यावर स्कार्फ बांधायला हवा. म्हणजे सुर्याची किरणं थेट चेहऱ्यावर पडणार नाहीत.

(जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी तरुणी; धडकी भरवणारा VIDEO)

2. फेशियल केल्यानंतर त्वचा सॉफ्ट झालेली असते. त्यामुळे फेशियलनंतर थ्रेडिंग करू नये. कारण थ्रेडिंग करताना भरपूर वेदना होतात. त्यामुळे फेशियलच्या आधीच थ्रेडिंग करा.

3. बाहेर जाणार असाल आणि मेकअप करावा लागणार असेल तर, फेशियल करू नका. कारण फेशियलनंतर आपली रोमछिद्र उघडतात. त्यावर मेकअप केला तर, इन्फेक्शनमुळे पिंपल्सही येऊ शकतात.

(नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम)

4. जिम करत असाल तर, फेशियल केल्यानंतर जिम किंवा हेवी फिजिकल एक्ससाईज करू नका.

5. फेशियल केल्यानंतर किमान 3 ते 4 तास चेहऱ्यावर काहीही लावू नका. कारण चेहऱ्याला आरामाची गरज असते. चेहरा जास्त ऑयली वाटत असेल तर, फक्त पाण्याने धुवा.

(पोटदुखीपासून हृदयरोग, डायबेटिज, कॅन्सरवरही गुणकारी; घरात हवंच हे आयुर्वेदिक औषध)

6. शरीर हायड्रेट राहण्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्या.

7. चांगला इफेक्ट हवा असेल तर, कमीत कमी 24 तास चेहऱ्यावर साबण किंवा फेसवॉश वापरू नका.

First published:

Tags: Beauty tips, Lifestyle, Skin care, Women