जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Parenting Tips : तुमचं मुल पहिल्यांदा शाळेत जातंय का? अशी दूर करा त्याच्या मनातील भिती

Parenting Tips : तुमचं मुल पहिल्यांदा शाळेत जातंय का? अशी दूर करा त्याच्या मनातील भिती

Parenting Tips : तुमचं मुल पहिल्यांदा शाळेत जातंय का? अशी दूर करा त्याच्या मनातील भिती

पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या (First Time In Schools) मुलांच्या मनात शाळेविषयी भिती असते. तुमचंही मूल पहिल्यांदाच शाळेत (School First Day) जात असेल तर काही गोष्टींची (Parenting Tips) विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर शाळा सुरू झाल्या (Schools Start) आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आधीपासूनच शाळेत जाणारी मुलं मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असतात, तर नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या (First Time In Schools) मुलांच्या मनात शाळेविषयी भिती असते. शाळेतील पहिल्याच दिवशी (First Day Of School) असे मुलं खूप घाबरतात. तुमचंही मूल पहिल्यांदाच शाळेत (School First Day) जात असेल तर काही गोष्टींची (Parenting Tips) विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जन्मापासूनच पालकांच्या सावलीत सुरक्षित वाटणाऱ्या मुलांसाठी शाळेचे वातावरण पूर्णपणे नवीन असते. त्यामुळे त्यांना शाळेत जाताना भिती वाटने किंवा न जावेसे वाटणे स्वाभाविक आहे. हे फक्त मुलांच्या बाबतीत घडतं असं नाही. तर पालकांनाही पहिल्यांदाच मुलांना स्वत:पासून वेगळे करणे अवघड जाते. शिवाय मुलाला शाळेत पाठवल्यानंतरही पालकांचं लक्ष त्याच्याकडेच असते. परंतु काही खास टिप्स फॉलो करून तुम्ही मुलाच्या शाळेचा पहिला दिवस सर्वोत्तम बनवू शकता. पाल्याला शाळेत जाण्याची ट्रेनिंग द्या पहिल्यांदाच शाळेत जाणारी लहान मुलं अनेकदा तेथील वातावरणाला आणि अनोळखी लोकांना घाबरतात. त्यामुळे तुम्ही मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी त्यांना शाळेत जाण्याचे प्रशिक्षण देऊ शकता. त्यासाठी घरात मुलांना शाळेसारखे वातावरण देण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलांसाठी नर्सरी राइम्स घेऊन या आणि त्यांची त्यांना ओळख करून द्या. असे केल्याने ते पहिल्यांदा शाळेत जातील तेव्हा त्यांना या गोष्टींशी परिचित असल्यासारखे वाटेल.

पावसाळ्यात चहा-भजीची पार्टी पडेल भारी; चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

शाळेआधी प्ले स्कूलमध्ये प्रवेश घ्या मुलांचा थेट शाळेत प्रवेश करण्याऐवजी त्यांना काही काळ प्ले स्कूलमध्ये किंवा अंगनवाडीत पाठवा. तेथे मुले इतर मुलांशी आणि शिक्षकांमध्ये मिसळण्यास सुरुवात करतील आणि शाळेत घेल्यानंतर त्यांना फारसे वेगळे वाटणार नाही आणि त्यांच्या मनातील भितीही कमी झालेली असेल. मुलांशी गप्पा मारा, त्यांना बोलतं करा शाळेतून परतल्यावर मुलांशी खूप बोला, त्यांनाही बोलतं करा. मुलांना त्यांच्या शाळेतील पहिला दिवस कसा होता हे विचारा. त्याला शाळेत सर्वात जास्त काय आवडले आणि शिक्षकांनी त्याला काय शिकवले हे विचारा. त्यांना काही गोष्टी समजल्या नसतील त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही मुलांचे मन सहज समजू शकाल आमि मुलांच्या मनातून शाळेची भीती दूर करण्यास तुम्हाला मदत होईल.

चेहऱ्यावरील पिगमेंटेशन तुमचं इम्प्रेशन खराब करतंय? या पद्धतीने वापरा एरंडेल तेल, त्वचा होईल सुंदर आणि ग्लोइंग

बेसिक मॅनर्स शिकवा मुलांना पहिल्यांदा शाळेत पाठवण्यापूर्वी त्यांना शाळेच्या कसे वागावे कसे बोलावे हे सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करा. मुलांना शाळेत शौच्यास जाण्यासाठी शिक्षकांची परवानगी घ्यायला शिकवा. तसेच मित्रांसोबत वस्तू शेअर करण्याची सवय लावा. त्यामुळे मुलांना शाळेत लवकर मित्र बनवता येतील आणि ते शाळेचा आनंद घेऊ लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात