जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चेहऱ्यावरील पिगमेंटेशन तुमचं इम्प्रेशन खराब करतंय? या पद्धतीने वापरा एरंडेल तेल, त्वचा होईल सुंदर आणि ग्लोइंग

चेहऱ्यावरील पिगमेंटेशन तुमचं इम्प्रेशन खराब करतंय? या पद्धतीने वापरा एरंडेल तेल, त्वचा होईल सुंदर आणि ग्लोइंग

चेहऱ्यावरील पिगमेंटेशन तुमचं इम्प्रेशन खराब करतंय? या पद्धतीने वापरा एरंडेल तेल, त्वचा होईल सुंदर आणि ग्लोइंग

कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेलात ओमेगा 3 सारखे फॅटी अॅसिड असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर (Caster Oil For Skin) असते. एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्याने त्वचा निरोगी राहते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जुलै : एरंडाच्या बियापासून बनवलेले एरंडेल तेल, कॅस्टर ऑइल (Caster Oil) म्हणूनदेखील ओळखले जाते. एरंड ही एक प्रकारची भाजी आहे. जी प्राचीन काळापासून अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापरली जाते. शरीरातील केस आणि त्वचेसाठी एरंडेल तेल (Caster Oil For Skin) उत्तम पर्याय आहे. एरंडेल तेलात भरपूर अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. जे तुमच्या केसांसोबतच त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात. बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे त्वचेच्या पिगमेंटेशनच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी (Get Rid Of Pigmentation) एरंडेल तेल खूप प्रभावी मानले जाते. एरंडेल तेलामध्ये ओमेगा-3 सारखे फॅटी ऍसिड असते, जे त्वचेतील नवीन, निरोगी आणि हेल्दी पेशी (Healthy Cells) किंवा ऊतींच्या वाढीस मदत करतात. एरंडेल तेलाचा रंग पिवळा असतो. जो त्वचेसाठी खूप फायदेशीर (Caster Oil Benefits) मानला जातो. चला जाणून घेऊया एरंडेल तेलाचा वापर करून त्वचेचे पिगमेंटेशन कसे दूर करावे. पिगमेंटेशनसाठी चेहऱ्यावर एरंडेल तेल कसे वापरावे - चेहऱ्यावरील पिगमेंटेशन घालवण्यासाठी एक चमचा एरंडेल तेलामध्ये समान प्रमाणात मध आणि लिंबाचा रस घ्यावा. त्यानंतर एका भांड्यात तिन्ही गोष्टी नीट मिसळा. हे तयार केलेले मिश्रण ब्रश किंवा बोटांच्या मदतीने लावा आणि अर्धा तास चेहऱ्यावर राहू द्या. अर्ध्या तासानंतर चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा.

विकेंडला बाहेर जाण्याचा कंटाळा आलाय? घरीच पार्टनरसोबत असा स्पेंड करा क्वालिटी टाइम

- एरंडेल तेलाचा फेस पॅक (Caster Oil Face Pack) बनवण्यासाठी तुम्हाला एरंडेल तेलाच्या 2 कॅप्सूल, कोरफड आणि व्हिटॅमिन ई घ्यावे. सर्व साहित्य चांगले मिसळा आणि पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर गोलाकार पद्धतीने चेहऱ्याला मसाज करा आणि नंतर साधारण अर्ध्या तासाने थंड पाण्याने धुवा. Pranayama Benefits : प्राणायाम केल्याने वाढते आयुष्य, ‘हे’ आहेत काही प्रकार आणि प्राणायाम करण्याची योग्य पद्धत - हळदीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवतात. एरंडेल तेलात अर्धा चमचा हळद आणि तितकेच बेसन घेऊन व्यवस्थित मिक्स करा. ही पेस्ट जाडसर ठेवा. ही पेस्ट बोटांनी गोलाकार पद्धतीने मसाज करून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर अर्धा तास तशीच राहू द्या आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात