मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » पावसाळ्यात चहा-भजीची पार्टी पडेल भारी; चहासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

पावसाळ्यात चहा-भजीची पार्टी पडेल भारी; चहासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

चहासाठी विचारलं की आपल्याकडे शक्यतो कुणीच नाही म्हणत नाही. इतकं लोकांना चहाचं वेड (Tea Lover) असतं. घरी कोणी पाहुणे जरी आले तरी आपण सर्वप्रथम त्यांना चहा देतो. चहा भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य घटक आहे. तर असा हा चहा, काही लोक नुसताच पितात आणि काही लोकांना या चहासोबत अनेक वेगवेगळे पदार्थ (Tea Time Snacks) खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का? चहासोबत काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानीकारक असते. चहासोबत हे पदार्थ खाल्याने आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाचा कोणते आहेत ते पदार्थ.