मुंबई, 4 फेब्रुवारी : गोलगप्पा किंवा पाणीपुरी खाण्याचा ट्रेंड भारतात खूप प्रसिद्ध आहे. हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. मसालेदार पाणीपुरी पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की हे असे स्ट्रीट फूड आहे, जे तोंडाची चवच बदलत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. होय, पाणीपुरी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदेदेखील होऊ शकतात.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर पाणीपुरी खातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, तिने या व्हिडिओला 'आप लोग किसी के प्यार में भीगे भीगे भीगे? मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमची स्वतःची रील बनवा' असे कॅप्शन दिले आहे.
आर्टिफिशियल स्वीटनर वापरताना या चुका टाळा, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
युरीनच्या समस्येपासून सुटका मिळेल
पाणीपुरीचे पाणी पोटाच्या समस्यांपासून मुक्त करू शकते. घरी बनवलेल्या पाणीपुरीच्या पाण्यात गोड कमी घालून पुदिना, जिरे, हिंग टाकल्याने पचनशक्ती मजबूत होते. पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणारी हिरवी कोथिंबीर पोटफुगी आणि लघवीची समस्या दूर करते. तसेच पाण्यात असलेले हिंग त्याच्या अँटी फ्लॅट्युलॅन्स गुणधर्मांमुळे मासिक पाळीच्या वेदना आणि ओटीपोटातील वेदना टाळण्यास मदत करते.
आम्लता नियंत्रित करते
जिरे श्वासाची दुर्गंधी रोखण्यासोबतच पचनास मदत करते. पुदिन्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे पचनास मदत करतात. तसेच हे पोटातील क्रॅम्प शांत करते आणि अॅसिडिटी नियंत्रित करण्यासदेखील मदत करते. इरिटेबल बोवेल सिंड्रोमच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. पेपरमिंट पोटदुखी कमी करण्यास मदत करते. त्याचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तोंडाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. यामुळे नाक व्यवस्थित स्वच्छ होते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
अधिक कॅलरी जाळण्यास मदत करते
घरी पाणीपुरी बनवल्यास त्याचा जास्त फायदा होतो. पाणीपुरी बनवण्यासाठी रवा किंवा मैद्याऐवजी संपूर्ण गव्हाचे पीठ वापरल्यास ते शरीरासाठी फायदेशीर ठरते. प्रथिनेयुक्त बनवण्यासाठी बटाट्याऐवजी उकडलेले हरभरे वापरा. पाण्याऐवजी तुम्ही घरगुती दही वापरू शकता. हे तुम्हाला अधिक कॅलरीज बर्न करण्यात मदत करेल. काही कोशिंबीर चटणीबरोबरही घालता येते. अशाप्रकारे पाणीपुरी तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.
चाळिशीनंतर महिलांनी नक्की खावे हे पदार्थ, शरीर राहील Fit आणि Healthy
गॅसची समस्या सोडवते
तुम्ही सामान्य मिठाऐवजी काळे मीठदेखील वापरू शकता. यामुळे गॅसची समस्या दूर होते. याशिवाय तुमचा मूड फ्रेश होण्यास मदत होते. ऊन आणि कडक उन्हात लोक अनेकदा अस्वस्थ होतात. या दरम्यान चिडचिड होते आणि अधिकाधिक पाणी पिण्याची इच्छा होते. घरी बनवलेली पाणीपुरी खाऊन त्याचे पाणी प्यायल्यास पूर्ण ताजेतवाने वाटेल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Shraddha kapoor