जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Organic Food Benefits : आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते ऑर्गॅनिक फूड? कशी करावी ओळख?

Organic Food Benefits : आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते ऑर्गॅनिक फूड? कशी करावी ओळख?

Organic Food Benefits : आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते ऑर्गॅनिक फूड? कशी करावी ओळख?

निरोगी राहण्यासाठी ऑर्गॅनिक फूड (Organic Food For Health) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक फूड म्हणजे काय, त्याचे शरीराला काय फायदे (Organic Food Benefits) होतात आणि ते कसे ओळखावे हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी ( Healthy And Fit Body) आहार खूप महत्त्वाचा असतो. परंतु आजकालच्या अनियमित जीवनशैलीमुळे बहुतेक लोक खाण्यापिण्याबाबत हवी तेवढी काळजी (Health Tips) घेत नाहीत. कोरोना संकट कमी झाले असले तरी त्यामुळे सुदृढ शरीर आणि चांगली रोगप्रतिकारशक्तीचे (Strong Immune System) महत्त्व लोकांच्य लक्षात आले आहे. त्यामुळे अनेक लोक पौष्टिक आणि निरोगी आहाराला (Healthy Lifestyle) महत्त्व देत आहेत. अनेक लोक आपल्या आहारातून रसायनमुक्त खाद्यपदार्थांना दूर करून सेंद्रिय अन्न म्हणजेच ऑर्गॅनिक फूडला (Organic Food) प्राधान्य देत आहेत. निरोगी राहण्यासाठी ऑर्गॅनिक फूड ( Organic Food For Health) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक फूड म्हणजे काय, त्याचे शरीराला काय फायदे होतात (Organic Food Benefits) आणि ते कसे ओळखावे हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ऑर्गॅनिक फूड म्हणजे काय? (What is Organic Food) यासाठी सर्व प्रथम ऑर्गॅनिक म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. ऑर्गॅनिक फूड एका संपूर्ण प्रक्रियेतून तयार होत असते. कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम कीटकनाशकांशिवाय आणि खतांशिवाय शेतात जे अन्न धान्ये पिकवले जातात त्यांना ऑर्गॅनिक फूड म्हणतात. अशा प्रकारचे पिक घेण्यासाठी त्याची विशेष काळजी घेतली जाते. या पिकांचे कीटक आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी शेड उभारून विशिष्ट प्रकारची जाळी वापरली जाते. तसेच शेतीमध्ये केवळ शेणखत आणि इतर नैसर्गिक खतांचा आणि औषधांचा वापर केला जातो. ऑर्गॅनिक फूड घेताना रसायनिक खतं, कीटकनाशकं किंवा इतर कोणत्याही कृत्रीम औषध किंवा खतांचा वापर पूर्णपणे टाळला जातो. त्यामुळे हे अन्न शरीरासाठी अतिशय पौष्टीक आणि निरोगी असते.

चेहऱ्यावरील पिगमेंटेशन तुमचं इम्प्रेशन खराब करतंय? या पद्धतीने वापरा एरंडेल तेल, त्वचा होईल सुंदर आणि ग्लोइंग

ऑर्गॅनिक फूड कसे ओळखावे? (How to identify organic food) कोणते अन्न ऑर्गॅनिक आहे आणि कोणते रासायनिक आहे हे केवळ पाहून लक्षात येणे शक्य नसते. ऑर्गॅनिक पदार्थांवर ते ऑर्गॅनिक असल्याचे स्टिकर असते किंवा ठळक अक्षरात तशी नोट लिहिलेली असते. तसेच ऑर्गॅनिक फूड खाल्ल्यानंतर त्याची चव कळू शकते. याशिवाय सेंद्रिय भाज्या लवकर शिजतात आणि ऑर्गॅनिक मसाल्यांना तीव्र सुगंध असतो. या गोष्टींवरून तुम्ही ऑर्गॅनिक फूडची ओळख करू शकता. ऑर्गॅनिक अन्न पदार्थ सामान्य अन्न पदार्थांपेक्षा महाग असतात. परंतु ते खाल्ल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहते आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते. विकेंडला बाहेर जाण्याचा कंटाळा आलाय? घरीच पार्टनरसोबत असा स्पेंड करा क्वालिटी टाइम ऑर्गॅनिक फूडचे काय आहेत फायदे? (Benefits of Organic Food) ऑर्गॅनिक फूड कोणत्याही हानिकारक घटकांशिवाय पिकवले जाते. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.ऑर्गॅनिक फूडमध्ये या शरीरासाठी आवश्यक असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक आणि आयर्न हे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच यात मिनरल्स देखील भरपूर प्रमाणात आढळतात. ऑर्गॅनिक फूड खाल्ल्याने अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. तसेच मायग्रेन, हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय ऑर्गॅनिक फूडमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. ऑर्गॅनिक फूडमुळे त्वचा तजेलदार होते आणि लठ्ठपणा देखील कमी करण्यासाठी मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात