Home /News /lifestyle /

Health Care Tips: पायऱ्या चढताना लगेच धाप लागते? या गंभीर आजाराचा धोका असू शकतो

Health Care Tips: पायऱ्या चढताना लगेच धाप लागते? या गंभीर आजाराचा धोका असू शकतो

4 ते 5 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तर ही बाब हलक्यात घेऊ नका. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याबाबत जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 16 जून : 3 ते 4 मजल्यांच्या पायऱ्या चढून गेल्यावर धाप लागणे कॉमन बाब आहे. पण काहींना थोड्या पायऱ्या चढल्यावर लगेच दम लागतो, असं होत असेल तर हे नॉर्मल नाही. 4 ते 5 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तर ही बाब हलक्यात घेऊ नका. यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे दमा किंवा इतर प्रॉब्लेम. अशा परिस्थितीत आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत की 3 ते 4 पायऱ्या चढल्यावरच दम लागण्याचे कारण काय (What Causes Shortsness Of Breath Going Stairs) असू शकते? याबाबत झी न्यूजने बातमी दिली आहे. पायऱ्या चढताना धाप लागण्याची ही लक्षणे - छातीत दुखणे, ताप येणे किंवा घाम येणे, खोकला, हातपाय दुखणे, पायांना सूज येणे, खाज येणे किंवा पुरळ येणे, चक्कर येणे. या कारणांमुळे पायऱ्या चढताना धाप लागते- श्वसनाची कारणे - श्वसन प्रणालीला शरीरातून कार्बन डायऑक्साइड काढून ऑक्सिजन पुरवण्यासाठी फुफ्फुस, मेंदू आणि छातीच्या स्नायूंचे कार्य नीट होण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही पायऱ्या चढताच तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर ते ऍलर्जी किंवा दम्यामुळे होऊ शकते. हे वाचा - Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा? लठ्ठपणा - जास्त वजन असलेल्या लोकांना पायऱ्या चढताना श्वास लागण्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर वजनावर नियंत्रण ठेवा. हे वाचा -  जेवणाची भांडी, ताट-वाटीचाही आरोग्यावर होतो परिणाम; या गोष्टींकडे दुर्लक्ष नको बैठी जीवनशैली- बैठी जीवनशैली किंवा निष्क्रिय जीवनशैली श्वासोच्छवासाचे कारण ठरू शकते. आपण अॅक्टिव नसल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना जास्त मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे पायऱ्या चढताच श्वासोच्छवास सुरू होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या