मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश! फक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार

भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश! फक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणार

फक्त एक ब्लड टेस्ट (Blood test) 25 कॅन्सरचं (Cancer) निदान पहिल्याच टप्प्यात करू शकते, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

फक्त एक ब्लड टेस्ट (Blood test) 25 कॅन्सरचं (Cancer) निदान पहिल्याच टप्प्यात करू शकते, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

फक्त एक ब्लड टेस्ट (Blood test) 25 कॅन्सरचं (Cancer) निदान पहिल्याच टप्प्यात करू शकते, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

मुंबई, 09 मे : कर्करोग अर्थात कॅन्सर (Cancer) हा एक प्राणघातक विकार. बऱ्याचदा असं होतं, की एखाद्या धडधाकट व्यक्तीला अचानक काही तरी व्हायला लागतं आणि नंतर स्पष्ट होतं, की त्याला कॅन्सर आहे नि तो शेवटच्या टप्प्यात आहे. कॅन्सर पहिल्या टप्प्यात असताना निदान झालं (Cancer test), तर काही तरी औषधोपचार (Cancer treatment) करून रुग्णाचं आयुष्य वाढवता येतं. या पार्श्वभूमीवर, काही भारतीय शास्त्रज्ञांनी रक्ताच्या एका साध्या तपासणीतूनच (Blood test) कॅन्सरच्या पहिल्या टप्प्याचा (Cancer First Stage) शोध लागेल असं एक तंत्र विकसित केलं आहे. हे तंत्र 100 टक्के प्रभावी आहे. या टेस्टचं (Test) नाव HrC असं असून, मुंबईची एपिजेनेरस बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि सिंगापूरची जार लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून ही टेस्ट विकसित केली आहे. या तंत्राचं वैशिष्ट्य हे आहे, की यातून 25 वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचं निदान होऊ शकतं. काही प्रकारच्या कॅन्सरचं निदान तर ट्यूमर विकसित होण्याच्या आधीही करणं या तंत्राद्वारे शक्य आहे, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. मुंबईचे नॅनोटेक शास्त्रज्ञ विनयकुमार त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांची या कंपनीत मोठी भागीदारी आहे. जार लॅबचे प्रमुख आशिष त्रिपाठी यांनी असा दावा केला आहे, की कॅन्सरचं पूर्वनिदान करणारी ही जगातली पहिलीच टेस्ट आहे. भविष्यात संबंधित व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका किती आहे, याचा अंदाज या टेस्टमधून बांधता येऊ शकतो. व्यक्तीला वर्षातून एकदाच HrC टेस्ट करावी लागेल. त्याद्वारे, व्यक्तीला कॅन्सर असल्यास त्याचं पहिल्या टप्प्यातच निदान होऊ शकेल. आशिष यांचे जावई आणि मुंबई पोलिस दलातील दिवंगत वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय (Himanshu Roy) यांच्यावरून टेस्टला HrC हे नाव देण्यात आलं आहे. कॅन्सरशी झुंज देता देता 2018 मध्ये त्यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं होतं. हे वाचा - DRDO च्या Anti-Covid Drug ला मंजुरी; कमी ऑक्सिजनमध्ये औषधानेच बरा होणार रुग्ण या टेस्टमध्ये स्टेम सेल टेक्निक (Stem Cell Technique) अर्थात मूळपेशी तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे. स्टेम सेल्स म्हणजे शरीराच्या अशा पेशी, की ज्यांमध्ये स्वतःच्या प्रतिकृती बनवण्याची क्षमता असते आणि त्या दुसऱ्या प्रकारच्या पेशींमध्ये स्वतःला बदलू शकतात. बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स लाल आणि पांढऱ्या रक्तपेशींची निर्मितीही करू शकतात. अशा वैशिष्ट्यपूर्ण स्टेम सेल्सचं महत्त्व खूप असतं. व्हेरीस्मॉल एम्ब्रियॉनिक लाइक स्टेम सेलचा (VSEL) वापर करून त्रिपाठी आणि त्यांच्या टीमने शरीरातल्या रक्ताशी संबंधित एक स्केल तयार केलं आणि ते 104 कॅन्सर रुग्णांच्या समूहाच्या आधारे तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर संशोधकांनी एक हजार लोकांवर चाचण्या घेतल्या. त्यात एक हजार जण कर्करोगग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं. या चाचण्या प्राथमिक पातळीवर यशस्वी झाल्या. जेनेटिक सिग्नेचर ओळखून ही टेस्ट कॅन्सरचं निदान करते. VSEL यापेशी खूपच सूक्ष्म असतात. त्यामुळे त्या वेगळ्या करण्याचा दावा सहज केला जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर ही कंपनी आपल्या टेस्टला मंजुरी मिळण्यासाठी आणि ती बाजारात येण्याकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. आतापर्यंत केवळ एक हजार व्यक्तींवरच या तंत्राच्या क्लिनिकल ट्रायल्सझाल्या आहेत. अद्याप तिला वापरासाठी मंजुरी मिळालेली नाही. स्टेम सेल रिव्ह्यू अँड रिपोर्ट्स नावाच्या एका जर्नलमध्ये या संशोधनाबद्दलचा लेख ऑनलाइन प्रसिद्ध झाला आहे. हेटेस्ट किट सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी या टेस्ट किटला परवानग्या मिळवण्यासाठी आणि लॅबचं नेटवर्क वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याची पहिली लॅब मुंबईत तयार होईल. हे वाचा - अरे बापरे! लेकीच्या डोक्यात उवा झाल्या म्हणून आईला पाठवलं तुरुंगात जगात होणाऱ्या दर सहा मृत्यूंमागे एका मृत्यूचं कारण कॅन्सर हे असतं, असं अमेरिकन कॅन्सर सोसायटीची आकडेवारी सांगते. 2017 मध्ये एक कोटी 70 लाख लोकांना कॅन्सर झाला होता. भारतात 22 लाखांहून अधिक कॅन्सर रुग्ण असून, त्यात दरवर्षी 11 लाख जणांची भर पडते, असं नोएडाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन अँड रिसर्च या संस्थेचं म्हणणं आहे. त्यामुळे या टेस्टच्या चाचण्यांच्या निकालाकडे औषध आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबरच गुंतवणूकदारांचंही लक्ष आहे. या चाचण्या यशस्वी झाल्या, तर हा खूप मोठा शोध ठरेल. कारण कॅन्सरचं पहिल्या टप्प्यातच निदान करणारा हा शोध गेमचेंजर ठरेल. कॅन्सर जितका उशिरा कळतो, तितका त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे हे तंत्र कर्करोगाने होणारे मृत्यू कमी करण्यास मदत करू शकतं.
First published:

Tags: Cancer, Health, Serious diseases, Test

पुढील बातम्या