वॉशिंग्टन, 08 मे : अनेकांच्या डोक्यात उवा (Lice) असतात. केसांची स्वच्छता न राखणं, केसांमध्ये घाम अशा कितीतरी कारणांमध्ये उवा होतात. जर केसातून या उवा वेळीच हटवल्या नाहीत किंवा त्यावर काही उपचार केले नाहीत तर त्यांचं प्रमाण वाढतं आणि अगदी या छोट्याशा उवाही गंभीर आणि जीवघेण्या इन्फेक्शनला कारणीभूत ठरू शकतात. अमेरिकेतील एका चार वर्षांच्या मुलीला असंच उवांमुळे इन्फेक्शन (lice infection) झालं. त्यामुळे तिच्या आईला अटक करण्यात आली आहे (Mother arrested for daughter head lice).
ही घटना आहे अमेरिकेच्या इंडियानातील. एका चार वर्षांच्या मुलीच्या डोक्यात इतक्या उवा झाल्या की त्यामुळे तिला इ्फेक्शन झालं. हे इन्फेक्शन इतकं गंभीर होतं की तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आहे. मुलीची प्रकृती इतकी खराब झाली होती की तिचा जीवही गेला असता. तिच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. तिला वाचवणं जवळजवळ अशक्यच होतं. पण सुदैवाने ती वाचली आहे.
हे वाचा - गरम वाफ-पाण्यानंतर चक्क आगीचा गोळा; कोरोनापासून बचावाच्या भयंकर उपायाचा VIDEO
या मुलीला गेल्या महिन्यात स्कॉट्सबर्गमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिच्या शरीरातील ऑक्सिजन इतकं कमी झालं होतं की रुग्णालयाने पोलिसांनाच बोलावलं. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितलं की रुग्णालयात जेव्हा मुलीला भरती करण्यात आलं तेव्हा तिच्या शरीरातील हिमोग्लोबिन तपासण्यात आलं. हिमोग्लोबिन सामान्यपणे 12 ग्रॅम प्रति डेसिलीटर असतं पण या मुलीच्या शरीरात ते फक्त 1.7 ग्रॅम/डीएल होतं. याआधी इतक्या प्रमाणात हिमोग्लोबिनची पातळी कमी झालेला कोणताच रुग्ण आपण पाहिला नसल्याचं रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे या मुलीचा मृत्यूही झाला असता अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
मुलीला तिच्या आईपासूनच उवाचं इन्फेक्शन झालं होतं. मुलीच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा केल्याचा आरोप तिच्या आईवर लाववण्यात आला. 26 वर्षीय शाययने निकोल असं तिच्या आईचं नाव. तिला या आठवड्यात अटक करण्यात आली आहे.
हे वाचा - VIDEO : मला लग्न करायचं आहे! भलताच हट्ट करत बाबासमोर ढसाढसा रडली चिमुकली लेक
डेली मेलने लेक्सिंगटन हेरॉल्डचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार पोलीस तपासात या मुलीच्या सहा वर्षांच्या बहिणीलाहा उवांचं इन्फेक्शन झालं होतं. तिच्या शाळेत चौकशी केली असताना शाळेतून तिला याच कारणामुळे सलग तीन दिवस घरीही पाठवण्यात आलं होतं. पण त्यानंतर कमीत कमी 31 दिवस ती शाळेत आलीच नाही. तिची हिमोग्लोबिन पातळीही 8.7 g/dL होती. पण तिच्या छोट्या बहिणीइतकी ती घातक नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Serious diseases, Woman hair