नवी दिल्ली, 08 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. ऑक्सिजनअभावी कित्येक रुग्णांचा मृत्यू होतो आहे. याचदरम्यान आता केंद्र सरकारने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अशा औषधाला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे ऑक्सिजनची गरज कमी होण्यास मदत होईल. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) 2-deoxy-D-glucose (2-DG) या औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डीआरडीओची इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्रितरित्या हे औषध तयार केलं आहे. हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच या औषधाचं उत्पादन घेत आहे.
Drugs Controller General of India approves anti-COVID drug developed by @DRDO_India for emergency use
— PIB India (@PIB_India) May 8, 2021
Clinical trial results have shown that this molecule helps in faster recovery of hospitalized patients and reduces supplemental oxygen dependence
Read: https://t.co/L2ixpQUPlx pic.twitter.com/5qohE4jGtx
औषधाचं क्लिनिकिल ट्रायल यशस्वी झालं आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचं ट्रायल घेण्यात आलं, ते रुग्ण इतर कोरोना रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच रुग्णांना ऑक्सिजनची गरजही कमी पडू लागली, असं सांगण्यात आलं आहे. हे वाचा - कोविड रुग्णालयात दाखल होण्याच्या नियमात बदल; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय हे औषध पावडर स्वरूपात आहे. पाण्यात मिक्स करून दिलं जातं. औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होतं ऐआणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करून व्हायरसला वाढण्यापासून रोखतं. ट्रायलचे निकाल आणि सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हे औषध खूप फायदेशीर ठरेल यासाठी कोरोना रुग्णांवर आता या औषधाने उपचार केले जाणार आहे. मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे.