मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सूर्य असा असतो? आजपर्यंत कधी न पाहिलेला फोटो नासाने केला शेअर

सूर्य असा असतो? आजपर्यंत कधी न पाहिलेला फोटो नासाने केला शेअर


नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

     मुंबई, 02 जानेवारी :  ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पोटात जगाच्या निर्मितीची अनेक रहस्यं दडलेली आहेत, त्याचप्रमाणे अंतराळामध्येही अनेक गुपितं दडलेली आहेत. अंतराळातील घडामोडींकडे अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनसारख्या (नासा) विविध देशांच्या अंतराळ संशोधन संस्था लक्ष ठेवून असतात. नासा वेळोवेळी या घडामोडींचे फोटोही शेअर करत असते. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण म्हणजे पृथ्वीने नवीन कक्षेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अमेरिकन स्पेस एजन्सी नासानं सूर्याचा एक चित्तथरारक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये, सूर्य अतिशय तीव्र सोलर फ्लेअर्स उत्सर्जित करत असल्याचं दिसत आहे. सोलर फ्लेअर्स म्हणजेच सौर ज्वाला हे उर्जेचे शक्तिशाली स्फोट असतात.

    नासाच्या म्हणण्यानुसार, फ्लेअर्स आणि सोलर इरप्शन्स हे रेडिओ संप्रेषण, इलेक्ट्रिक पॉवर ग्रीड आणि नेव्हिगेशन सिग्नलवर परिणाम करू शकतात. शिवाय, अंतराळ यान आणि अंतराळवीरांसाठीही धोका निर्माण करू शकतात. नासानं एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये खुलासा केला की, सूर्य 4.5 अब्ज वर्षांहून अधिक जुना आहे. आपल्या वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना नासानं लिहिलंय, "पृथ्वीपासून 93 दशलक्ष मैल (150 दशलक्ष किमी) अंतरावर असलेल्या ताऱ्याच्या वतीनं सर्वांना #हॅपी न्यू इअर. आपण आपल्या सूर्याभोवती नवीन प्रदक्षिणा सुरू करत आहोत."

    View this post on Instagram

    A post shared by NASA (@nasa)

    नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टमध्ये म्हटलं आहे, "वैश्विकदृष्ट्या मध्यमवयीन आणि यलो ड्रॉफ म्हणून सूर्याचं वर्गीकरण केलं गेलं आहे. गतिशील आणि सतत बदलणारा सूर्य सौर मंडळामध्ये सतत ऊर्जा पाठवतो. अंतराळतज्ज्ञ आपल्या सूर्यमालेतील सर्वात प्राचीन गोष्टी पाहून सूर्याच्या वयाचा अंदाज लावू शकतात. या गोष्टी आणि सूर्य एकाचवेळी तयार झाले असल्याचा अंदाज आहे."

    (Optical Illusion: फक्त 15 सेकंद! पुस्तकांमध्ये लपलेली काडीपेटीतील काडी शोधून दाखवाच)

    नासानं शेअर केलं आहे की, सूर्य आपल्या सौरमालेच्या केंद्रस्थानी आहे. आठ लाख 65 हजार मैल रुंदीच्या (1.4 दशलक्ष किलो मीटर) या गोळ्याच्या केंद्राचं तापमान 27 दशलक्ष डिग्री फॅरेनहाइटपर्यंत (15 दशलक्ष अंश सेल्सिअस) पोहचतं. सूर्याचं गुरुत्वाकर्षण आपल्या सौर मंडळाला एकत्र ठेवतं. अगदी सर्वांत मोठ्या ग्रहांपासून ते अंतराळातील सर्वांत लहान घटकांपर्यंत सर्वजण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियंत्रणात असतात.

    इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शननुसार, "सोलर डायनॅमिक ऑब्झर्व्हेटरीमध्ये (एसडीओ) सूर्याचा हा फोटो कॅप्चर केला गेला आहे. एसडीओसह या अंतराळातील वेधशाळा असलेल्या यानसह अनेक यानांचा ताफा सूर्याचं दिवसरात्र निरीक्षण करतो. हेलिओफिजिक्स नावाच्या विज्ञानाच्या शाखेत सूर्याबद्दलची माहिती मिळते.

    "एसडीओ हे जिओसिंक्रोनस पॅटर्नमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करतं. न्यू मेक्सिकोच्या रेखांशावर आठ आकारामध्ये त्याचं मार्गाक्रमण होतं. त्यामुळे ते सतत पृथ्वीवरील रेडिओ अँटेनाच्या दृष्टीक्षेपात असतं. एसडीओ वर्षातून दोन वेळा ग्रहणाच्या स्थितीतून जातं. जेव्हा हे अवकाशयान दिवसातून 72 मिनिटांसाठी पृथ्वीच्या आड जातं तेव्हा ही स्थिती येते. इथं दाखवल्याप्रमाणं सूर्य पृथ्वीच्या सावलीत लपला जातो.

    (VIDEO : बाईकस्वाराचा श्वास रोखायला लावणारा स्टंट; क्षणात बाईक पोहोचवली डोंगरावर)

    नासाच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे, "4.5 अब्ज वर्षांनंतरही सूर्य गरम आणि सुंदर दिसत आहे. यामागील रहस्य काय आहे?" "हे सुंदर आहे! आपल्या सर्वांच्या जगण्यासाठी आणि भरभराटीसाठी काहीतरी महत्त्वाचे निर्माण करण्यासाठी तो (सूर्य) काय करत आहे हे देवाला माहीत आहे. छान फोटो," अशी कमेंट आणखी एका युजरनं केली आहे. तिसऱ्या युजरनं म्हटलं आहे, "जेम्स वेबनं पुन्हा एकदा जगाला आश्चर्यचिकत केलं आणि सर्वांसमोर सूर्याचं सौंदर्य आणलं आहे. आपण जेम्स वेबच्या निर्मात्याचं कौतुकच केलं पाहिजे. 2023 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा."

    First published:

    Tags: Nasa