मुंबई, 28 डिसेंबर : कुतूहल माणसाला गप्प बसू देत नाही. माणसाच्या याच स्वभावामुळे अनेक शोध लागले, अनेक कोडी उलगडली. यातूनच अनेक खेळ व नवी कोडी जन्माला आली. असे खेळ बुद्धीचा कस पाहणारे असतात सोशल मीडियावर तर त्यांना खूप पसंती मिळते. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच दृष्टीभ्रमाच्या माध्यमातून एखाद्या चित्राविषयीची अभासी प्रतिमा तयार करून त्यातून नजरेला फसवणारी कोडी तयार केली जातात. असंच एक कोडं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यात अनेक रंगीत पुस्तकांच्या ढिगात लपलेली एक काडीपेटीची काडी वाचकांना शोधायची आहे. ती काडी 15 सेकंदांमध्ये शोधणारी व्यक्ती बुद्धिमान असेल. ऑप्टिकल इल्युजनचे काही प्रकार असतात. ऑप्टिकल इल्युजनच्या माध्यमातून निरीक्षणशक्ती चांगली होते. एखाद्या गोष्टीचं आकलन किती होतं हे जाणून घेण्यासाठीही या कोड्यांची मदत होते. त्यामुळे स्वतःची आकलनशक्ती विकसित करण्यासाठी तसंच निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी अनेक जण या कोड्यांचा वापर करतात. यातून एकाग्रताही वाढते. एखाद्या समस्येवर उत्तर शोधण्याची क्षमता विकसित होते. यामुळे बुद्धी तल्लख होते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्याचा उपयोग होतो. हेही वाचा - नववर्षात धनु राशीच्या व्यक्तींचे नशीब जोरावर, पण या गोष्टीची घ्यावी लागणार काळजी; अन्यथा… सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यामध्ये वाचकांना पुस्तकांच्या ढिगाऱ्यात लपलेली आगपेटीची काडी शोधायची आहे. रंगीबेरंगी पुस्तकांचा ढिग एकमेकांवर ठेवलेला चित्रात दाखवला आहे. काही पुस्तकं उलटी तर काही सुलटी ठेवलेली आहेत. त्यातच एक आगपेटीची काडीही लपली आहे. ही काडी 15 मिनिटांत शोधणं हे आव्हान आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या माध्यमातून तुमची बुद्धिमत्ता चाचणी घेता येते. मात्र बुद्धिमत्ता तपासण्यासाठी आणखीही इतर चाचण्या असतात. ज्यांना खरोखरच बुद्धिमत्ता तपासायची आहे, त्यांनी ऑप्टिकल इल्युजनच्या एका माध्यमावरच अवलंबून राहू नये. इतरही अनेक प्रकारे बुद्धिमत्ता चाचणी घेता येते. वरील चित्रामध्ये लपलेली आगपेटीची काडी शोधण्यालाठी चित्र काळजीपूर्वक पाहा. पुस्तकांचे सगळे ढीग त्यांची पानं यांचं नीट निरीक्षण करा. कदाचित हे आव्हान तुम्ही पूर्ण करू शकाल. मात्र तरीही या कोड्याचं उत्तर सापडलं नाही, तर एक हिंट देता येईल. आगपेटीच्या काडीचं टोक हिरव्या रंगाचं आहे. आता ती काडी शोधणं अधिक सोपं होईल. तरीही नाही सापडली, तर डाव्या बाजूच्या वरच्या भागात दोन पुस्तकांमध्ये ती काडी सापडेल. एकाग्रता, निरीक्षणशक्ती, डोळे व बुद्धीचा योग्य वापर यामुळेच ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवता येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.