ब्रिटन, 22 जून : काही दिवसांपूर्वी गोरिला ग्लू सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. एका महिलेने आपल्या केसांवर गोरिला ग्लू लावला, या महिलेचा व्हिडीओ पाहून एका व्यक्तीनेही आपल्या ओठांनाच गोरिला ग्लू लावला. गोरिला ग्लू चॅलेंजमुळे या दोघांचीही काय अवस्था झाली हे तुमहाला माहितीच आहे. दरम्यान आता ग्लूबाबतच एक बातमी समोर येते आहे, हा ग्लू म्हणजे नेल ग्लू (Nail glue in eye) आहे. जो एका महिलेनं आयड्रॉप म्हणून चक्क डोळ्यात टाकला आणि तिची अवस्था अतिशय भयंकर झाली. यूकेतील 35 वर्षांची केटी बेथने आयड्रॉप समजून चुकून आपल्या एका डोळ्यात नेल ग्लू टाकला. टीव्ही पाहत असताना तिने आपल्या डोळ्यात नेल ग्लू टाकला आणि तिला गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागलं. हे वाचा - मादीने घातलेली अंडी काही न खाता हा 50 दिवस ठेवतो तोंडात; किंमत तर ऐका माशाची द सनशी बोलताना केटीने सांगितलं, “तापामुळे माझ्या डोळ्यात जळजळ होत होती. म्हणून मी आयड्रॉप्स टाकायचा विचार केला. माझ्या बॅगेत मला आयड्रॉप सापडलं नाही. नंतर एका ठिकाणी आयड्रॉपसारखीच बाटली मला दिसली. त्या बाटलीतील काही ड्रॉप मी माझ्या डोळ्यात टाकली. माझे डोळे जळजळू लागले. मी पुन्हा काही ड्रॉप डोळ्यात टाकले आणि त्यानंतर मी बाटली पाहिली. त्यानंतर मी धावत जाऊन माझे डोळे धुतले आणि लगेच डॉक्टरांकडे गेली” डॉक्टर तिला पाहून हैराण झाले. डॉक्टरांनी कापूस गरम पाण्यात भिजवून तिचे डोळे स्वच्छ केले. तिने फक्त दोन थेंब नेल ग्लू डोळ्यात टाकला होता. पण यामुळे तिच्या डोळ्यांची दृष्टी गेली असती. हे वाचा - No Panty Day म्हणजे काय? महिला का साजरा करतायत हा दिवस? “मी डोळे उघडले तेव्हा ते लाल होते, सूजलेले होते, मला जळजळ जाणवत होती.डोळ्यांच्या खालील पापण्यांवर सुकलेला ग्लू चिकटलेला होता. हे खूप वेदनादायी होतं. त्यामुळे कोणतंही औषध वापरताना बाटली तपासून घ्या”, असं आवाहनही तिनं सर्वांना केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.