वॉशिंग्टन, 11 ऑक्टोबर : सेक्स (Sexual Relationship) ही तशी वैयक्तिक गोष्ट (Personal Life). फक्त दोन व्यक्तींमधील खासगी क्षण (Sexual life). यादम्यान कंडोम (Condom) वापरायचा की नाही हे ठरवण्याचा निर्णय त्या दोघांचा. पण आता कंडोम वापर कायद्याअंतर्गत आला आहे (Law for condom use). त्यामुळे आता कायद्यानुसराच कंडोमचा वापर (Condom use) करावा लागणार आहे. पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढून टाकल्यास (Stealthing) आता गुन्हा दाखल होणार आहे (Non consensual condom removal).
कित्येक जण सेक्सदरम्यान आपल्या पार्टनरच्या सहमतीशिवाय कंडोम काढून टाकतात. या प्रकाराला स्टील्थिंग (Stealthing) म्हणतात. यामुळे महिला तिच्या मनाविरुद्ध गरोदर होण्याची शक्यता असतेच. पण कित्येक लैंगिक आजारही होण्याची भीतीही (Stealthing and sexual diseases) असते. याचा सर्वांत जास्त धोका देहविक्रीव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना (Stealthing and sex workers) असतो. मात्र आता स्टील्थिंग करण्यापूर्वी अशा व्यक्तींना दोन वेळा विचार करावा लागणार आहे. कारण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात याविरुद्ध कायदा (California law against stealthing) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता पार्टनरच्या सहमतीशिवाय कंडोम काढल्यास, आरोपीला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी याबाबतच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियामध्ये कोणीही सेक्सदरम्यान पार्टनरच्या तोंडी संमतीशिवाय (Can’t remove condom without partner’s permission) कंडोम काढला, तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करता येणार आहे. डेमोक्रॅटिक असेम्ब्लीच्या सदस्या क्रिस्टिना गार्सिया (Cristina Garcia) कित्येक वर्षांपासून हा कायदा तयार व्हावा यासाठी मागणी करत होत्या. अखेर त्यांच्या 2017 पासूनच्या लढ्याला यश मिळालं आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला बिनविरोध मंजुरी देण्यात आली.
हे वाचा - हिच्याकडून INSULT करून घ्यायला धडपडतात पुरुष; अपमानासाठी मोजतात हजारो रुपये
स्टील्थिंगच्या प्रकरणांची आकडेवारी (Cases of Stealthing) पाहता हे विधेयक पारित करण्यात आलं. यासाठी कित्येक सर्वेक्षणांची मदत घेण्यात आली. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने (National library of Medicine survey on Stealthing) 2019 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं, की 21 ते 30 वर्षांच्या सुमारे 12 टक्के महिलांना याचा अनुभव आला होता. याचदरम्यान झालेल्या आणखी एका सर्वेक्षणात 10 टक्के पुरुषांनी सेक्सदरम्यान पार्टनरच्या संमतीशिवाय हळूच कंडोम काढून टाकल्याचं आढळलं होतं.
या विधेयकानुसार एखाद्या व्यक्तीने आपल्या पार्टनरच्या परवानगीशिवाय कंडोम काढलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यानंतर पीडित व्यक्ती आरोपीकडून नुकसानभरपाई (Legal action against Stealthing) मिळवू शकते. अर्थात आरोपीसाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद या विधेयकात नाही. याबाबत बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत गार्सिया म्हणतात, "स्टील्थिंग हे केवळ अनैतिकच नाही, तर बेकायदेशीरदेखील आहे. मला अजूनही वाटतं, की याबाबतच्या गुन्ह्यामध्ये शिक्षेची तरतूद असावी. कारण अशा प्रकारचं कृत्य हे बलात्कार किंवा लैंगिक अपराधांच्या श्रेणीत येतं"
हे वाचा - आश्चर्य! 9 महिने नाही, फक्त 8 मिनिटांची प्रेग्नन्सी; काही क्षणात जन्माला आलं बाळ
अर्थात हे विधेयक पारित झाल्यानंतर यावर कित्येकांनी प्रश्न (People confused about Stealthing) उपस्थित केले आहेत. एखाद्या व्यक्तीने परवानगी दिली होती की नव्हती हे न्यायालयात कसं सिद्ध करणार, (How to prove stealthing) असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच, कंडोम चुकून निघाला की मुद्दाम काढला हेदेखील सिद्ध करताना अडचणी येणार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आणणारं कॅलिफोर्निया पहिलं राज्य असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं गार्सिया म्हणाल्या. या वेळी त्यांनी अमेरिकेतल्या इतर राज्यांनाही अशा प्रकारचा कायदा लागू करण्याचे आवाहन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Lifestyle, Sexual health