Home /News /lifestyle /

आश्चर्य! 9 महिने नाही तर फक्त 8 मिनिटांची प्रेग्नन्सी; अवघ्या काही क्षणातच जन्माला आलं बाळ

आश्चर्य! 9 महिने नाही तर फक्त 8 मिनिटांची प्रेग्नन्सी; अवघ्या काही क्षणातच जन्माला आलं बाळ

आपण प्रेग्नंट आहोत हे या महिलेलाही माहिती नव्हतं.

    लंडन, 11 ऑक्टोबर : चक्कर येणं, उलटी होणं किंवा मळमळणं, मासिक पाळी बंद होणं अशी प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणं दिसतात. सामान्यपणे प्रेग्नन्सी 9 महिन्यांची असते. या कालावधीत जसजसं बाळ पोटात वाढतं तसतसं पोटाचा आकारही वाढतो. याला बेबी बम्प म्हणतात. पण एका महिलेला यापैकी कोणतीच लक्षणं दिसली नाही. तिने 9 महिने नाही तर 8 मिनिटांची प्रेग्नन्सी अनुभवून अवघ्या काही क्षणातच बाळाला जन्म दिला आहे. 23 वर्षांची टिल्डा कंटाला, सिंगल मदर असून तिला दोन वर्षांची एक मुलगी आहे. पण ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती, याची कल्पना तिलाही नव्हती. अचानक सकाळी झोपेत तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या आणि जळजळ जाणवत होती. त्यामुळे तिला जाग आली. खाण्यात काहीतरी गडबड झालयामुळे असं झालं असावं असं तिला वाटलं. पण नंतर तिला पुश करावंसं वाटलं. हे वाचा - आपला 'आजार' पाहून हादरली तरुणी, डॉक्टरविरोधातच केली तक्रार; काय आहे प्रकरण पाहा काही सेकंदातच तिला डोकं आणि काळे केस दिसू लागले. तेव्हा आपल्या पोटातील वेदना सामान्य नाहीत तर प्रसूती वेदना आहेत हे तिला समजलं. बाळ बाहेर येत असल्याचं पाहून तिने तिच्या आईला बोलावलं आणि अॅम्ब्युलन्सही बोलावण्यात आली. पण तोपर्यंत तिची डिलीव्हरी झाली होती. तिने एका मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव आता एलेक असं ठेवण्यात आलं. द सनच्या रिपोर्टनुसार टिल्डाने सांगितलं गेल्या काही दिवसांपासून तिचं वजन वाढत होतं. पण तिच्या वजनात बदल होतच असतो, त्यामुळे तिने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. तिला पीरिअड्ससुद्धा यायचे. ती प्रेग्नंट होती हे तिलाच माहिती नव्हतं. त्यामुळे तिच्यासाठी तसा हा धक्काच होता. हे वाचा - तुमच्या Bank खात्यांशी संबंधित माहिती पत्नी, मुलांना देणं यासाठी आहे महत्त्वाचं यानंतर टिल्डा आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिथं तिच्या काही टेस्ट करण्यात आल्या. कारण प्रेग्नन्सीत टेस्ट झाल्या नव्हत्या. आता आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Pregnancy

    पुढील बातम्या