पवित्र पाण्याने तयार केलेला हा 'Jeasus Shoes' मिनिटाच्या आत विकले गेले, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

जर तुम्ही या बुटाचा फोटो जवळून पाहिलात तर तुम्हाला दिसेल की बुटांच्या सोलमध्ये नदीचं पाणी तरंगताना दिसतं.

जर तुम्ही या बुटाचा फोटो जवळून पाहिलात तर तुम्हाला दिसेल की बुटांच्या सोलमध्ये नदीचं पाणी तरंगताना दिसतं.

  • Share this:
    कोणत्याही गोष्टीला देवाची गोष्ट म्हणून सांगण्यात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ती गोष्ट लाखो रुपयांना विकली जाते. यावेळीही काहीसं असंच झालं. पवित्र पाण्याने तयार करण्यातं आलेला लिमिटेड एडिशन असणारे बूट काही मिनिटांत आउट ऑफ स्टॉक झाले. एका बुटाच्या जोडीची किंमत 3 हजार अमेरिकी डॉलर एवढी आहे. भारतीय रुपयांनुसार ही किंमत साधारणपणे 2 लाख 13 हजार 139 रुपये इतकी आहे. पांढऱ्या रंगाचे हे बूट नाइकी कंपनीने तयार केले असून या बुटांना 'Jeasus Shoe' असं नाव देण्यात आले आहे. या बुटांना ब्रुकलिन येथील क्रिएटिव्ह लेबल MSCHF ने तयार केले आहेत. या बुटांचं वैशिष्ट्य म्हणजे जॉर्डन नदीचं पाणी यात टाकण्यात आले आहे. जर तुम्ही या बुटाचा फोटो जवळून पाहिलात तर तुम्हाला दिसेल की बुटांच्या सोलमध्ये नदीचं पाणी तरंगताना दिसतं. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त जॉर्डन नदीचं पाणी यात असल्यामुळे या बुटांना जास्त किंमत आली असेल तर पुन्हा एकदा फोटो निरखून पाहा. बुटांवर बायबलची आयत मॅथ्यू 14ः25 ही लिहिलं गेलं आहे. यामध्ये येशू पाण्यावर चालला असे लिहिले होते. बुटांच्या टोकावर रक्ताचा एक छोटा थेंबही आहे. याला येशूच्या रक्ताचं प्रतीक मानलं गेलं आहे. याशिवाय या बुटांमध्ये अनेक धार्मिक वैशिष्ट्य आहेत. बुटांच्या लेसच्या टोकाला क्रूस लटकवण्यात आलं आहे. या बुटांचा सोल लाल रंगाचा आहे. पोप पारंपरिकरित्या लाल रंगाचे चपला घालतात. जर बूट धार्मिक आहेत तर त्याचं कव्हरही काहीसं तसंच असणार ना.. बुटांच्या डब्यात एक दूत तयार करण्यात आला आहे आणि एक सीलही लावण्यात आलं आहे. हे सील पोप यांच्या अधिकृत पॅपल सीलशी मिळतं- जुळतं आहे. न्यूयॉर्क पोस्टचा संदर्भ देऊन फॉक्स न्यूजने लिहिले की, हेड ऑफ कॉमर्स डॅनिअल ग्रीनबर्ग यांच्या मते, या संकल्पनेचा विचार करून फार कमी बूट तयार करण्यात आले होते. ते असंही म्हणाले की, या संकल्पनेवर आता अजून बूट तयार करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. VIRAL VIDEO: या गावात दिसली सात तोंडी सापाची कात, लोकांनी वाहिलं हळद- कुंकू मेंदूशी निगडीत या 10 खोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल... देशातील या शहरातील लोक देतात सर्वाधिक कर, जाणून घ्या मुंबईचं स्थान हा 'Jeasus Shoes' काही मिनिटांत विकले गेले, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क
    Published by:Madhura Nerurkar
    First published: