कर्नाटकमधील कनाकापुरामध्ये बुधवारच्या सकाळी एकच गडबड उडाली होती. गावात सात तोंडाच्या सापाची कात दिसली. हिंदू पौराणिक कथांप्रमाणे सात तोंडी सापाचं वर्णन केलेलं आहे. मेरीगोवदना डोडी गावात सात तोंडी सापाची कात सापडल्याची चर्चा आजूबाजूच्या परिसरात आहे. यानंतर तिथल्या लोकांनी सापाच्या कातडीची पूजा करायला सुरुवात केली. त्यांनी कातेवर हळळ- कुंकू वाहून त्याची पूजा केली.
स्थानिक लोकांच्या मते गावात सहा महिन्याआधीही अशा प्रकारची कात दिसली होती. त्या कातेची पूजा करण्यासाठी एक मंदिरही तयार करण्यात आलं होतं. गावातील नागरिक प्रशांत म्हणाला की, 'गावकऱ्यांच्या मते, या जागी अनेक विशेष शक्ती आहेत. यामुळे इथे मंदिर तयार करण्यात आले. आता पुन्हा मंदिराच्या शेजारी सापाची कात पाहण्यात आली.'
न्यूज पोर्टल 'विजय कर्नाटक'च्या मते, यावेळी बलप्पा नावाच्या व्यक्तीच्या शेतात सात तोंडी सापाची कात दिसली. हे शेत मंदिरापासून अगदी 10 पाऊलंच दूर आहे. अनेकांच्या मते, त्यांनी सात तोंडी सापही पाहिला. पण कोणालाही हे सिद्ध करता आलं नाही. फॅक्ट चेक वेबसाइट स्नॉप्स यांच्यामते, प्राण्यांच्या एकाहून अधिक तोंड असणाऱ्या अवस्थेला 'पॉलीसेफेली' असं म्हणतात. तीन तोंडी प्राणीही फार कमी दिसतात आणि आतापर्यंत अशा कुठल्या प्राण्याच्या जन्माची पुष्टी झालेली नाही. युनिवर्सल कन्नडा स्टुडिओ या यूट्यूब चॅनले हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Viral videos