कसं शक्य आहे? सहारा वाळवंटात आढळली 1.8 अब्ज झाडं, सॅटेलाइट PHOTO आले समोर

कसं शक्य आहे? सहारा वाळवंटात आढळली 1.8 अब्ज झाडं, सॅटेलाइट PHOTO आले समोर

सॅटेलाइटद्वारे काढलेल्या फोटोत या भागात जो हिरवा ठिपका दिसत होता त्या भागात प्रत्यक्ष जमिनीवर 1.8 अब्ज झाडं असल्याचं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे.

  • Share this:

वाळवंटात हिरवळ दिसून आल्यास, साधारणत: कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र असा प्रकार खरच साहेल आणि सहारा वाळवंटाच्या नापीक जमिनीत घडला आहे. यावर आधी अभ्यासकारांचा विश्वास नव्हता. मात्र सॅटेलाइट फोटो आणि कॉम्प्युटरच्या सहाय्याने सखोल अभ्यास केल्यावर लक्षात आलं की ती खरोखरंच झाडं आहेत.

खरं तर याआधी दुर्लक्षित राहिलेल्या या पश्चिम आफ्रिकेतील सहारा आणि साहेल वाळवंटातील या भागाने आधीच्या सगळ्या धारणाच चुकीच्या ठरवल्या आहेत. सॅटेलाइटद्वारे काढलेल्या फोटोत या भागात जो हिरवा ठिपका दिसत होता त्या भागात प्रत्यक्ष जमिनीवर 1.8 अब्ज झाडं असल्याचं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. या नव्या माहितीमुळे या तथाकथित सब ह्युमिड परिसराचं नावंच बदलेल.

कोपनहेगन विद्यापीठाच्या भूगोल विभागातील सहाय्यक प्राध्यापक ब्रॅंडट यांनी एएफपीला ही माहिती दिली. ते म्हणाले, " सहारा वाळवंटात बरीच झाडं वाढत आहेत हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. या वाळवंटात दूरवर वाळूच आहे झाडं अजिबात नाहीत. पण या वाळवंटाच्या काही भागांत वृक्षांची घनता जास्त आहे. तसंच वाळवंटातील टेकड्यांच्या परिसरातही काही झाडं वाढत आहेत."

वाचा-प्रमाणात घेतल्यास औषध आहे भांग; एक ना दोन कित्येक फायदे आहेत वाचा

या सर्वेक्षणात संशोधक आणि संरक्षकांना जी माहिती मिळाली ती जंगलतोडीविरूद्ध लढा देण्याच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करण्यास आणि जमिनीवरील कार्बन स्टोरेज मोजण्यास मदत करू शकेल. या अभ्यासातील सहाय्यक आणि नासामध्य प्रोग्रॅमर म्हणून काम करणारा जेसी मेयेर म्हणाला,"एका वर्षात किंवा पुढील दहा वर्षांत पुनरूज्जीवन आणि जंगलतोड कमी करण्याचे प्रयत्न प्रभावी आहेत की नाही यासाठी पुन्हा अभ्यास केला जाईल".

वाचा-तान्ह्या बाळांच्या शरीररचनेत शास्त्रज्ञांना आढळले बदल; जाणून घ्या काय आहेत कारणं

झाडं शोधणं आणि मोजणं हे सोपे काम नव्हतं. उपग्रहांनी काढलेल्या फोटोंमध्ये शोधताना भरपूर झाडं असलेल्या भागांत दाट झाडी पण लगेच सापडते पण एवढ्या मोठ्या वाळवंटात झाडं शोधून काढणं हे काम खूप किचकट होतं.

ब्रॅंट आणि त्यांच्या टीमने एक उपाय काढला त्यांनी उपग्रहाचे हाय रिझोल्युशनचे फोटो आणि सखोल अभ्यास कॉम्प्युटर प्रोग्रॅममध्ये टाकले आणि शोध घेतला. तरीही त्या प्रोग्रॅमच्या मदतीने झाडं शोधायची होतीच. ब्रॅंडने तब्बल 90,000 झाडं एकट्याने मोजून एका वर्षात पूर्ण केली. बुधवारी नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात 1.3 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसराचा अभ्यास करण्यात आला असून, त्यासाठी 11,000 फोटो तपासण्यात आले आहेत.

वाचा-दोन तेलांचं मिश्रण करेल कमाल; त्वचेच्या समस्या होती दूर, सौंदर्यही खुलेल

जगातील प्रत्येक झाडाचं स्थान कुठं आहे यानुसार नकाशे तयार करणं हे सध्या तरी शक्य नाही. असं न्यूअल मेक्सिको राज्य विद्यापीठाच्या वनस्पती आणि पर्यावरण विभागाचे नील पी. हॅनन आणि ज्युलियस आंचांग यांनी सांगितलं. या नव्या पद्धतीच्या आधारे पृथ्वीवरील विविध भागांत कुठे कुठे वनक्षेत्र आहे, कार्बन कुठे आहे यासगळ्याची माहिती मिळवणं शक्य होईल आणि त्याचबरोबर त्याचा फायदा पर्यावरण संवर्धनासाठी होईल.

Published by: Priyanka Gawde
First published: October 15, 2020, 10:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या