Home /News /lifestyle /

प्रमाणात घेतल्यास औषध आहे भांग; एक ना दोन कित्येक फायदे आहेत वाचा

प्रमाणात घेतल्यास औषध आहे भांग; एक ना दोन कित्येक फायदे आहेत वाचा

महाशिवरात्री आणि होळीला घेतली जाणारी भांग (bhang) आरोग्यासाठी इतकी फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला माहितीही नसेल.

  • myupchar
  • Last Updated :
    जेव्हा जेव्हा 'भांग' हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात फक्त एक मादक पदार्थ समोर येतो. हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेल्या महाशिवरात्रीला भगवान शिव शंकर यांचा प्रसाद म्हणून भांग दिली जाते, तर होळीला भांग मिश्रित दुधाचं पेय दिलं जातं. भांग प्यायल्यानंतर नशा चढते, मात्र याचे आरोग्यासाठीदेखील बरेच फायदे आहेत. भांग हा एक पदार्थ आहे जो त्याच्या औषधी महत्त्वासाठी देखील मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. यात कॅनाबिनॉइड्स नावाचा घटक आहे जो कफ आणि पित्त सारख्या समस्यांपासून आराम देतो. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, भांगेचा प्रभाव गरम आहे. याचं सेवन केल्यानं पचन प्रक्रियेस मदत होते. झोपेमध्ये मदत होते आणि घशातील आवाज साफ होण्यास मदत होते. मात्र वारंवार वारंवार सेवन केल्यानं त्याचं व्यसन लागू शकतं. त्यामुळे सतत आणि जास्त प्रमाणात भांगेचं सेवन टाळलं पाहिजे. तसंच गर्भवती महिला आणि मुलांनी याचं सेवन करू नये. तर पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास त्यांना वंध्यत्व येऊ शकतं. त्वचेची समस्या भांगेची पानं बारीक वाटून घ्या आणि नंतर ही पेस्ट त्वचेवर लावा. यामुळे त्वचेला जखम असल्यास बरी होते. त्वचेला थंडावा मिळतो. सूर्य प्रकाशाने त्वचेवर होणारा परिणामही कमी होतो. डोकेदुखीपासून आराम भांग डोकेदुखीची समस्या दूर करते. 25 ग्रॅम वाटलेली भांग दररोज सकाळी आणि संध्याकाळी दूध किंवा पाण्यातून घेतल्यानं झोपेची समस्या दूर होते आणि डोकेदुखी पासून देखील आराम मिळतो. झोप लागण्यास अडचण आल्यास पायांच्या तळव्यांवर भांग तेलाने मालिश करा. यामुळे शांत झोप लागेल. संधिवाताच्या वेदनांमध्ये फायदेशीर संधिवाताच्या वेदना आणि सूज दररोजच्या कामांमध्ये अडथळा आणतात. भांग तेलाने मालिश केल्यास सांधेदुखीची समस्या दूर होऊ शकते. दम्यामध्ये आराम दम्यापासून मुक्त होण्यासाठी भांग प्रभावी ठरू शकते. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वाली यांनी सांगितलं, दम्यात श्वसनमार्गात सूज आल्यामुळे श्वसनमार्ग संकुचित होतो. यामुळे श्वास घेताना आवाज येणं, धाप लागणं, छातीत घट्टपणा आणि खोकला या समस्या उद्भवू लागतात. 125 मिलीग्राम भांग 2 मिलीग्राम मिरपूड आणि 2 ग्रॅम खडीसाखर मिसळून याचं सेवन केल्याने आराम मिळतो. भांग जाळून त्याच्या धुराचा वास घेतल्यानेदेखील या समस्येत आराम मिळतो. कान दुखण्यापासून आराम कानदुखी दूर करण्यासाठी देखील भांगेचा वापर केला जाऊ शकतो. 8-10 थेंब भारतीय भांगेचा रस कानात टाकल्याने कानाचं दुखणं दूर होतं. यासाठी मोहरीच्या तेलात भांग उकळवू थंड करून हे तेल कानात घाला. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - घरगुती उपाय न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health, Home remedies

    पुढील बातम्या