मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तान्ह्या बाळांच्या शरीररचनेत शास्त्रज्ञांना आढळले बदल; जाणून घ्या काय आहेत कारणं

तान्ह्या बाळांच्या शरीररचनेत शास्त्रज्ञांना आढळले बदल; जाणून घ्या काय आहेत कारणं

 बालकांच्या शरीराच्या ठेवणीत अनेक बदल होत आहेत. माणुष्य प्राण्याची उत्क्रांती अद्यापही सुरूच आहे. हे यातून दिसून येतं. शास्त्रज्ञांना तान्ह्या बाळांच्या शरीररचनेत कोणते बदल आढळले जाणून घेऊया.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 14 ऑक्टोबर: पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातीमध्ये वेळेनुसार बदल होत असतात. हा डार्विनचा सिद्धांत आहे. पृथ्वीवर जीवन सुरू झाल्यानंतर 'मनुष्य' ही सर्वात विकसित झालेली प्रजाती आहे नव्या संशेधनानुसार आता लहान मुलांच्या शरीरात काही वेगळेच बदल निदर्शनास येत आहेत. मायक्रो इव्हॅल्युएशनच्या प्रक्रियेत आढळले अनेक बदल नवजात बालकांचा जबडा हा नेहमीपेक्षा थोडा छोटा असणं, तसंच त्यांच्या पायांमध्ये जास्त हाडं असणं असे बदल शास्रज्ञांनी बघितले आहेत. यासह वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या लहान बालकांमध्ये अक्कल दाढ आढळत नाही. दंडांमध्ये शिरा अधिक आढळून येत आहेत. याबाबत जर्नल ऑफ अनॉटमीमध्‍ये अभ्यास प्रकाशित झाला आहे. त्यानुसार संशोधकांनी दावा केलाआहे की, मनुष्य हा अन्य कुठल्याही जीवांपेक्षा आणि आपल्या मागील कालावधीपेक्षा अधिक झपाट्याने विकास करत आहे. अक्कल दाढेत बदल होण्याचं कारण म्हणजे मानवाचा जबडा हा छोटा होत आहे. यामुळे दातांची जागा कमी झाली आहे, असंही संशोधकांचं म्हणणं आहे. डॉ. तेघान लूकस यांनी सांगितले की, आपली अन्न चावण्‍याची क्षमता वाढल्याने आणि नैसर्गिक बदलांमुळे तान्ह्या बालकांमध्ये अक्कल दाढ आढळून येत नसावी. मानवजातीत आताही बदल होत असल्याचे हा अभ्यास सांगतो. विशेष म्हणजे या बदलाचा दर हा 250 वर्षांपेक्षा जास्त आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार यामुळे मानवी जीवनाला कोणताही धोका नाही. या शोधाच्या सहलेखकांनी म्हणजे, हॅनबर्ग यांनी या बदलाला मायक्रो इव्हॅल्युएशन म्हटले आहे. आपली क्रांती आताही होत असल्याचं दिसते. विसाव्या शतकात मनुष्याच्या विविध अवयवांमध्ये किती बदल झाला आहे, या बाबीवर या संशोधनात अधिक भर देण्यात आला आहे. काही बाळांना हात आणि पायात अतिरिक्त हाड असतं तर काहींना पायांमध्ये जोडलेलं हाड असतं.
First published:

Tags: Lifestyle, Small baby

पुढील बातम्या