जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत घ्या 'या' गोष्टींची काळजी; वाचा काय करावं आणि काय करू नये

Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत घ्या 'या' गोष्टींची काळजी; वाचा काय करावं आणि काय करू नये

Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत घ्या 'या' गोष्टींची काळजी; वाचा काय करावं आणि काय करू नये

नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना (Ghatsthapana) म्हणतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 25सप्टेंबर- शारदीय नवरात्रौत्सव (Navratri festival) दुर्गादेवीच्या (Durga mata) भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या 9 दिवसांत देवीची मनापासून पूजा केल्याने जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतात, असं भक्त (Devotees) मानतात. या वर्षी नवरात्रौत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना (Ghatsthapana) म्हणतात. या दिवशी देवीची पूजा केल्याने जीवनात यश, आनंद आणि समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं. त्यामुळे घरात घटस्थापना करून व्रत केलं जातं. नवरात्रीच्या उपवासादरम्यान कडक शिस्तीचं (Strict discipline) पालन करावं लागतं. नवरात्रीच्या या नऊ दिवसांशी संबंधित अनेक परंपरा प्रचलित आहेत. अनेक जण या कालावधीत अखंड नंदादीपही तेवत ठेवतात. प्रत्येकाची इच्छा असते, की देवीची पूर्ण भक्तीने पूजा करावी, जेणेकरून कुटुंबात सुख आणि शांती राहील. या 9 दिवसांत काय करावं आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबद्दलची सर्वसामान्य माहिती जाणून घेऊ या. (**हे वाचा:** श्रीलक्ष्मीचा वरदहस्त लाभावा असं वाटतंय? पर्समध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी ) - नवरात्रीमध्ये दररोज देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. असं केल्याने इच्छा पूर्ण होतात. - तुम्ही नवरात्रीला 9 दिवस उपवास करू शकत नसाल, तर नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा आणि देवीची पूजा करावी. या 9 दिवसांत घरात स्वच्छता ठेवली पाहिजे. नवरात्रीत कुमारिका भोजन नक्की करावं. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही, असं मानलं जातं. (**हे वाचा:** तुम्हाला माहीत आहे नवरात्र उत्सव 9 दिवसच का असतो? जाणून घ्या नवरात्राविषयी सर्व ) या गोष्टी लक्षात ठेवा - धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात मांसाहार करू नये. तसंच लसूण, कांदा आणि अल्कोहोलचं सेवन करू नये. - नवरात्रीत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. - घरी आलेल्या पाहुण्यांना आणि भिक्षेसाठी आलेल्या व्यक्तीला आदराने अन्न अर्पण करावं. यामुळे माता भगवती प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. - उपवास करणाऱ्या व्यक्तीने चामड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरू नयेत. - दुर्गा मातेची आरती करावी. पूजेदरम्यान काही चूक किंवा कमतरता असल्यास ती आरतीद्वारे पूर्ण होते, असं मानलं जातं. - नवरात्रीच्या काळात पूजेसाठी देवीच्या भंग झालेल्या मूर्तीचा वापर करू नये. - उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. स्वच्छ कपडे घालावेत आणि दररोज आंघोळ करावी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात