मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हाला माहीत आहे नवरात्र उत्सव 9 दिवसच का असतो? जाणून घ्या नवरात्राविषयी सर्वकाही

तुम्हाला माहीत आहे नवरात्र उत्सव 9 दिवसच का असतो? जाणून घ्या नवरात्राविषयी सर्वकाही

नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी, हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो.

नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी, हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो.

नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी, हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 सप्टेंबर : महिलांचा आवडता सण म्हणजे नवरात्र (Navratra festival). मात्र, यावर्षी नवरात्र आठ दिवसांचा उत्सव असणार आहे. यावर्षी गुरुवार ७ ॲाक्टोबर रोजी नवरात्रारंभ- घटस्थापना आहे. यावर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने यावर्षी नवरात्र (Navratra) आठच दिवसांचे आले आहे. आठव्या दिवशी गुरुवार, दि. १४ ॲाक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आहे. त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे, अशी माहिती दा. कृ. सोमण (Damodar Krishnaji Soman), पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिली आहे.

नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी, हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो. नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु, नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने प्रत्येकीला आनंद होत असतो. इथे वस्त्र किती किंमतीचे आहे हा प्रश्न नसतो. केवळ रंगाने एकता निर्माण होत असते. त्याच रंगाचे वस्त्र परिधान केले नसले तरी पाप लागत नसते, किंवा नेसले तर पुण्य मिळत नसते ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी आहे. उत्सव हे आनंदप्राप्तीसाठीच असतात. हे रंग वारांवर ठरविले जात असतात, असे त्यांनी म्हटले आहे.

हे वाचा MAHAGENCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत इंजिनिअर्ससाठी पदभरती; 40,000 रुपये प्रतिमहिना पगार

नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का?

नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का असतो ? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. याचेही उत्तर आपणास शोधता येते. ‘ नऊ ‘ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो. आपल्या ऋषीमुनीनी सण-उत्सवांची रचना करतांना विज्ञानाचा किती बारकाईने विचार केला होता ही गोष्ट आपल्या लक्षात येते, असे सोमण यांनी म्हटले आहे.

हे वाचा - Video आई ही आई असते; क्षणार्धात बाळावर आलेलं मोठं संकट मातेनं आपल्यावर घेतलं आणि..

नवरात्रातील नवरंग..!

सोमण यांनी नवरात्रातील नवरंगही त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले आहेत. यावर्षीचे नवरात्रातील रंग पुढीलप्रमाणे आहेत. गुरुवार , दि. ७ आक्टोबर पिवळा, शुक्रवार, दि. ८ आक्टोबर हिरवा, शनिवार, दि. ९ आक्टोबर ग्रे, रविवार, दि. १० आक्टोबर केशरी, सोमवार, दि. ११ आक्टोबर सफेद, मंगळवार , दि. १२ आक्टोबर लाल, बुधवार , दि. १३ आक्टोबर निळा, गुरुवार, दि. १४ आक्टोबर गुलाबी..

First published:

Tags: Festival, Hindu