नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : घरून काम करणे (वर्क फ्रॉम होम) असो किंवा ऑनलाइन क्लासेस असोत, आता कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन हे आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. त्यांचा वापर आपल्याला करावाच लागतो, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनची हानिकारक किरणं सतत तासनतास आपल्या डोळ्यांना इजा करत असतात. स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ, वेदना, सूज, डोळे लाल होणे, डोकेदुखी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते, जर एखादी व्यक्ती दोन तासांपेक्षा जास्त वेळ संगणक किंवा डिजिटल स्क्रीन वापरत असेल तर त्याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होण्याची अधिक शक्यता असते. या समस्येपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे त्याविषयी जाणून घेऊया. कॉम्प्युटर विजन सिंड्रोमसाठी नैसर्गिक उपाय : अँटी ग्लेअर चष्मा - WebMD.com च्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीनसमोर काम करता तेव्हा अँटी-ग्लेअर ग्लासेस वापरा, ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवते आणि तुमच्या डोळ्यांचेही संरक्षण करते. पोजिशन : अनेकदा आपण चित्रपट किंवा कोणतीही ऑनलाइन वेबसिरीज पाहत असताना, आपल्या सोयीनुसार कोणत्याही स्थितीत बसतो. ऑफिसमध्ये काम करताना आपण अनेकदा चुकीच्या पद्धतीने बसतो, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. काम करताना आणि चित्रपट पाहताना आपली पोजिशन योग्य ठेवली पाहिजे. 20- 20-20 नियम: जेव्हा तुम्ही कोणतेही काम सतत करायला सुरुवात करता तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो, म्हणूनच दर 20 मिनिटांनी तुम्ही 20 फूट दूर असलेल्या कोणत्याही वस्तूकडे पहावे, असे किमान 20 सेकंद केल्याने तुमच्या डोळ्यांचा एक्सपोजर कमी होतो. हे वाचा - दीपिका पादुकोण जिममध्ये नेमकी कोणती एक्सरसाइज करते? कतरिना कैफने शूट केला VIDEO दुरून स्क्रीन पहा: अनेकदा काम करताना आपण कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनच्या स्क्रीनकडे किती जवळून पाहत आहोत, हे विसरून जातो, त्यामुळे डोळ्यांना फार त्रास होतो. त्यामुळे काम करताना कॉम्प्युटर स्क्रीन चेहऱ्यापासून 20 ते 25 इंच दूर राहावी याची काळजी घेतली पाहिजे. हे वाचा - ‘स्पर्म डोनरची गोष्ट! पॉकेटमनीसाठी केली सुुरुवात, आता वाटतं ही माझी मुलं आहेत?’ ब्रेक हवाच : सतत दोन तास कॉम्प्युटर स्क्रीनसमोर काम करत असाल तर किमान 15 ते 20 मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्यावी जेणेकरून तुमच्या डोळ्यातील ओलावा कायम राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.