मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /टक्कल पडायला लागलं? या उपायांनी केस गळणं थांबेल; येतील नवीन केस

टक्कल पडायला लागलं? या उपायांनी केस गळणं थांबेल; येतील नवीन केस

मग आपण पार्लर ट्रीटमेंटसाठी हजार रुपये खर्च करतो. पण आपण आपल्या वाईट सवयी सोडल्या नाही तर या सगळ्याचा आपल्या केसांवरती कोणताच चांगला परिणाम होऊ शकत नाही. केस निरोगी हवे असतील तर आपल्या वाईट सवयी सोडून द्या नाही तर टक्कल देखील पडू शकतं.

मग आपण पार्लर ट्रीटमेंटसाठी हजार रुपये खर्च करतो. पण आपण आपल्या वाईट सवयी सोडल्या नाही तर या सगळ्याचा आपल्या केसांवरती कोणताच चांगला परिणाम होऊ शकत नाही. केस निरोगी हवे असतील तर आपल्या वाईट सवयी सोडून द्या नाही तर टक्कल देखील पडू शकतं.

केस गळण्याची (Hair Fall) कारणं वेगवेगळी असली तरी, केस जास्त प्रमाणात गळाले तर, टक्कल (Baldness) पडल्याने विग लावायची वेळ येते आणि मग...

दिल्ली, 13 ऑगस्ट : सगळ्यांचेच थोडेफार केस गळतात (Hair Fall)  पण, काही केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर, टक्कल (Baldness)  पडायला लागतं. केस प्रमाणापेक्षा जास्त गळण्याची कारणं वेगवेळी असतात. हार्मोनच्या पातळीत (Imbalance Hormonal Level) अचानक बदल, बाळाच्या जन्मानंतर कमजोरी, स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता (Calcium Deficiency) आणि काही आजारांमुळेही केस गळण्याचा (Hair Loss Due to Illness) त्रास जास्त होतो. त्यानंतर टक्कल पडायला लागतं. टक्कल पडण्याचा त्रास वाढला असेल तर, काही उपाय (Remedies) करून केस वाचवता येतात.

जेष्ठमध आणि केशर

केस गळती थांबवण्यासाठी आणि टक्कल कमी करण्यासाठी जेष्ठमध वापरू शकता. यासाठी थोडं जेष्ठ मध घ्या. त्यात चिमूटभर केशर आणि दुधाचे काही थेंब घाला. नंतर त्याची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा.

(व्यायाम करणाऱ्यांनो करू नका ही चूक! 2 एनर्जी बुस्टर एकत्र घेतल्याने होतं नुकसान)

केळी आणि लिंबू

एक केळं चांगलं मॅश करा. त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. यानंतर, ही पेस्ट हेअर कलर ब्रशच्या मदतीने डोक्यावर लावा, काही तासांनंतर शॅम्पू करा. यामुळे केस गळणं देखील कमी होतं आणि केस पुन्हा वाढू लागतात.

कांदा

कांदा सोलून मधून दोन भाग करा. यानंतर, जिथे केस जास्त गळत आहेत. त्या ठिकाणी कांदा डोक्यावर हलक्या हाताने चोळा. हा उपाय रोज 5 ते 7 मिनिटं करा. यामुळे केस गळणं थांबेल आणि नवीन केसही येण्यास सुरवात होईल.

(काही चुका टाळल्या तरच येईल Facial Glow; ब्युटी पार्लरमध्ये जाण्याआधी वाचाच)

कलोंजी

केसांचं गळणं थांबवण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठी कालोंजीचा (कांद्याचं बी) वापर करू शकता. कलोंजी बारीक करून पावडर तयार करा. नंतर ही पावडर पाण्यात मिसळा आणि या पाण्याने आपले केस धुवा. काही दिवसात केस गळणं कमी होण्यास सुरवात होईल आणि डोक्यावर नवीन केसही वाढू लागतील.

आवळा-कडुलिंब

थोडी आवळा पावडर आणि कडुलिंबाची पानं पाण्यात नीट उकळा. आठवड्यातून दोनदा या पाण्याने आपलं डोकं धुवा. यामुळे केस गळणं थांबेल आणि नवीन केसही येऊ लागतील.

(करीना कपूरने प्रेग्नेन्सीत खाल्ले डिंकाचे लाडू; पुरुषांसाठीही डिंक असतो लाभदायक)

कोथिंबी

रकेस गळणं थांबवण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी कोथिंबीरचा वापर करू शकता. यासाठी कोथिंबीर बारीक वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट टाळूवर लावा आणि काही तासांनी शॅम्पू करा. काही दिवसात नवीन केस येण्यास सुरुवात होईल.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Tasty food