Home /News /lifestyle /

अरे बापरे! आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...

अरे बापरे! आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...

लेकीनेच आपल्या आईबाबत हा धक्कादायक खुलासा केला आहे.

    ब्रिटन, 17 जून : आपल्या मुलांची लग्न झाली, वय वाढलं की आता आपल्या अंगावर नातवंडं खेळावीत असं प्रत्येक वयस्कर व्यक्तीला वाटतं. म्हातारणात नातवंडांची आस लागलेली असते. त्यामुळेच मुलांची लग्न झाली की आता आम्हाला नातवंडं कधी देणार, असा प्रश्न दाम्पत्याला विचारला जातो. नातवंडासाठी आसुसलेल्या अशाच एका महिलेनं चक्क आपल्याला लेकीला स्पर्म इंजेक्शनच (Sperm injection) दिलं आहे. ब्रिटनमध्ये राहणारी लॉरेननं आपल्या आईने आपल्याला स्पर्म इंजेक्शन (Mother gave sperm injection to daughter) दिल्यासं सांगितलं. ब्रिटनमधील एसमदर्ड या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये लॉरेनने हा धक्कादायक खुलासा केला आहे. या शोमध्ये अगदी एकमेकींजवळ असलेली मायलेकीची जोड्या येतात. नुकतंच यामध्ये एक लेस्बियन कपल आणि त्यांची आई आली आहे. त्यांचीच चर्चा सध्या सुरू आहे. हे वाचा - डिओड्रन्टच्या वापराने होतो स्तनांचा कॅन्सर; काय सांगतं संशोधन? लॉरेन ही लेस्बियन आहे. या शोच्या प्रोमत लॉरन सांगते, की आपल्या आईमुळे तिला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. लॉरेनच्या आईला वाटतं की लॉरेननं आई व्हावं. पण लॉरेन यासाठी तयार नाही. आपल्या मुलीला आता मूल जन्माला घालण्यात काही रस नाही हे लक्षात येताच तिने लॉरेनला स्पर्म इंजेक्शन लावलं. लॉरेन म्हणते, माझी आई नेहमी मला सांगते की तिला माझ्या मुलांना पाहायचं आहे. त्यांच्यासोबत खेळायचं आहे. आम्ही नेहमी याबाबत चर्चा करतो. कदाचित यामुळेच तिच्या डोक्यात स्पर्म इंजेक्शनचा विचार आला होता. पण जेव्हा याबाबत माझ्या पार्टनरला समजेल, तेव्हा ती नाराज होईल, हेसुद्धा तितकंच खरं आहे. हे वाचा - खांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक तर लॉरेनची पार्टनर लॉरा म्हणते, लॉरेन आणि तिच्या आईमधील जवळीक पाहून आपल्याला अनेकदा वाटतं की आपण दोन महिलांशी लग्न केलं आहे. मला वाटतं मी एका पोलिगेमिस्ट नात्यात आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Relationship, Sex, Sexual health, Sexuality

    पुढील बातम्या