दिल्ली,17 जून : उन्हाळ्यामध्ये घामाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे (Body Odour) महिला किंवा पुरुष डिओड्रन्ट (Deodorant) वापरतात. काही महिला टू-इन-वन प्रॉडक्ट देखील वापरतात. यामध्ये डिओड्रंट आणि ऍन्टीपर्सपिरन्ट (Antiperspirant) असतं. यामुळे घामामुळे येणारी दुर्गंधी कमी होते. मात्र, याच घटकाचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो. अँटीपर्सपिरन्ट डिओड्रन्टमध्ये ऍल्युमिनियम (Aluminum)असतं जे शरीराला घातक आहे. ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्टमध्ये ऍल्युमिनियम आधारित असे काही घटक असतात जे घाम निर्माण करणाऱ्या पेशींवर एक प्रकारे आवरण तयार करतात. ज्यामुळे त्वचेवर घाम येणं कमी होतं. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनुसार ॲल्युमिनियम असलेल्या ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्टमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम एस्ट्रोजन हार्मोन्सवर होतो. ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्ट अधिक प्रमाणात वापरल्यास त्यामधील ऍल्युमिनियम घटक स्तनांच्या उतींवरती जमा व्हायला लागतात. त्यामुळे अंडरआर्मधून घाम पाझरणं कमी होतं. त्यामुळेच ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्ट वापरणं घातक ठरू शकतं. शक्य असेल तर ऍन्टीपर्सपिरन्ट फ्री डिओड्रन्ट वापरावं. ऍन्टी****पर्सपिरन्ट डिओड्रन्ट मुळे कॅन्सर होतो का? या संदर्भात अमेरिकन कॅन्सर सोसायटीने एक संशोधन केलं आहे त्यानुसार ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्ट वारणाऱ्या महिलांच्या अंडरआर्मच्या भागामध्ये ऍल्युमिनियमचा स्तर वाढायला लागतो. तो हळूहळू स्तनांच्या पेशींमध्ये देखील जमा व्हायला लागतो. ( फक्त एक भारतीय औषध, सर्व व्हेरिएंट्सचं काम तमाम; कोरोनाविरोधी लढ्यात मोठं हत्यार ) 2018 मध्ये एक संशोधन करण्यात आलं आहे, ज्यानुसार ऍल्युमिनियम महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम करतो. त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. 2017 मध्ये यासंदर्भात एक महत्त्वाचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार संशोधकांनी ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्टमुळे कॅन्सर (Cancer) होतो का याचा शोध घेण्याकरता 209 महिलांचे दोन गट तयार केले. दोन्ही गटातील महिला ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्ट वापरत होत्या आणि त्यांच्याच स्तनांच्या कॅन्सरची लक्षणं होती. तर,दुसऱ्या गटातल्या 209 महिलामध्ये कॅन्सर ची लक्षण नव्हती. ( VIDEO: माधुरी दीक्षितसारखं फिट राहायचंय; तिच्याबरोबरच दररोज करा ही योगासनं ) ज्या महिलांमध्ये कॅन्सरची लक्षणं होती त्या महिला वयाच्या तिशीपासून ऍन्टीपर्सपिरन्ट डिओड्रन्ट वापरत होत्या. या महिलांमध्ये ऍल्युमिनियम सॉल्टची मात्रा जास्त दिसून आली. दरम्यान शरीरात साठलेलं ऍल्युमिनियम कॅन्सरचं कारण बनतो का ? यासंदर्भात अद्याप ठोस पुरावे आढळले नाहीत. यासंदर्भात संशोधन केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.