नवी दिल्ली, 18 एप्रिल : त्वचा निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात भरपूर अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, पाणी, आवश्यक पोषक घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्वचा निरोगी ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण शरीराच्या अंतर्गत भागाचे बाह्य वातावरण आणि संसर्गापासून संरक्षण त्वचेमुळेच होते. हेल्थ लाइनने दिलेल्या माहितीनुसार, संशोधनात असे आढळून आले आहे की, आपण आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश केला तर निस्तेज त्वचा आणि बारीक सुरकुत्या कमी होऊ शकतात. अँटी-एजिंग फूड्स (Anti-aging foods) नैसर्गिकरित्या बायोटिन, इलॅजिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई ने समृद्ध असतात, जे कोलेजन वाढवण्यास मदत करतात. आज अशा खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊयात, जी रोजच्या आहारात आपण घेतल्यास त्वचेवरील सुरकुत्या, मुरुमे किंवा त्वचा ढिली पडण्याची समस्या कमी होईल आणि तुम्हाला कोणतेही अँटी-एजिंग क्रीम वगैरे वापरावे लागणार नाही. जाणून घेऊया त्वचा नेहमी तरुण ठेवण्यासाठी कोणते पदार्थ (look young for a long time) खावेत. त्वचा नेहमी तरुण राहण्याचा विशेष आहार - लाल भोपळी मिरची - लाल भोपळी मिरचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे त्वचेमध्ये कोलेजनची निर्मिती वाढण्यास मदत होते. लाल भोपळी मिरची सॅलड म्हणून खाल्ल्यास त्याचा खूप फायदा होईल. पपई - पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, ई, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फर, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी आढळतात. त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यासाठी हे घटक खूप उपयुक्त आहेत. फ्री रॅडिकल्स हे त्वचेवरील सुरकुत्या वाढवण्याचे काम करतात. हे वाचा - Summer tips : उन्हाळ्यात टाळा मसाल्यांचं अतिसेवन, होऊ शकतो त्रास ब्रोकोली - ब्रोकोलीमध्ये दाहक-विरोधी आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील आहेत. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिने त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. फक्त वाफवून घ्या खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरेल. पालक - पालकामध्ये त्वचेला हायड्रेटिंग आणि अँटी-ऑक्सिडंट समृद्ध घटक देखील असतात जे त्वचा गुळगुळीत, निरोगी ठेवतात. हे वाचा - शास्त्रज्ञांकडून कोरोनाच्या रहस्याची उकल;10-20 वर्षांआधीच आले होते 2 व्हायरस सुका मेवा - काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड इत्यादी सुक्या मेव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. या घटकांमुळे त्वचेच्या पेशींच्या पडद्याला बळकट करते, त्वचेचे सूर्याच्या हानीकारक किरणांपासून संरक्षण मिळते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढते. सुका मेवा आपण स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.