नवी दिल्ली, 18 एप्रिल: कोरोनामुळे सर्वांनाच स्वच्छतेची आणि वारंवार हात धुण्याची सवय लागली आहे. शिवाय आता उन्हाळ्यामध्ये कित्येक जण दिवसातून दोन-दोन वेळा आंघोळ करतात. यामुळेच आपला दिवसभरात साबणाशी येणारा संपर्क वाढला आहे. सध्या बाजारात कित्येक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. प्रत्येक ब्रँडचा आपला असा ठराविक रंगही (Soaps of different colour) असतो. शिवाय कित्येक ब्रँड आपले साबण वेगवेगळ्या सुगंधांसह, वेगवेगळ्या रंगांमध्येही लाँच करतात; मात्र तुम्ही कधी विचार केलाय का, की हिरवा, निळा, लाल, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगांच्या साबणातून केवळ पांढऱ्याच (White foam of soap) रंगाचा फेस का येतो? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित हा प्रश्न यापूर्वी पडला असेलही. विशेष म्हणजे, केवळ आंघोळीच्या साबणातूनच नाही, तर कपड्यांचा साबण, भांड्यांचा साबण, शॅम्पू, हँडवॉश या सगळ्यातून पांढऱ्याच रंगाचा फेस (Why does the foam of any soap is white) येतो. असं होण्यामागे काय कारण आहे, याबाबत येथे माहिती देत आहोत. जीएनटीटीव्ही (GNTTV) या वेबसाइटने याबद्दलची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. फक्त पाळी चुकणेच नव्हे तर हीसुद्धा आहेत प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणं प्रकाश आणि रंगांचा खेळ खरं तर कोणत्याही वस्तूला स्वतःचा असा रंग नसतो. प्रकाशाच्या किरणांमुळे आपल्याला ती गोष्ट रंगीत (Colour and light) दिसते. एखादी गोष्ट प्रकाशाची किरणं शोषून घेत असेल, तर ती गोष्ट आपल्याला काळी दिसते. तसंच, एखादी गोष्ट प्रकाशाच्या सर्वच किरणांना परावर्तित करत असेल, तर ती गोष्ट पांढरी (Science behind colours) दिसते. म्हणजेच एखादी वस्तू प्रकाशाच्या विशिष्ट किरणांना परावर्तित करत असेल, तर ती वस्तू त्या विशिष्ट रंगाची दिसू लागते. सोबतच, एखाद्या वस्तूमधून प्रकाशाची किरणं पूर्णपणे आरपार जात असतील, तर ती वस्तू दिसू शकत नाही. यामुळेच कित्येक जण काचेच्या दरवाजांना धडकल्याचं आपण पाहतो. काचेतून प्रकाश पूर्णपणे आरपार गेल्यामुळे ती काच अदृश्य (How can we see colours) असल्याचा भास निर्माण होतो. साबणाचा फेस का पांढरा? अॅथेन्स सायन्सच्या रिपोर्टनुसार, साबण कोणत्याही रंगाचा असला, तरी पाण्याच्या संपर्कात येताच त्याचे बारीक कण होतात. त्यांना पुढे बुडबुड्याचं स्वरूप प्राप्त होतं. तुम्ही हात धुताना किंवा कपडे धुताना तयार होणारा फेस (Soap foam science) नीट पाहिलात तर तुम्हालाही त्यात लहान लहान बुडबुडे दिसतील. हे बुडबुडे सप्तरंगी ट्रान्सपरंट फिल्मपासून बनलेले असतात. त्यामुळे यावर प्रकाशाची किरणं पडताच ती सर्व किरणं परावर्तित होतात. यामुळेच हे बुडबुडे (Soap bubbles) पांढऱ्या रंगाचे दिसू लागतात. त्यामुळेच, साबणाचा रंग भलेही लाल, हिरवा, निळा किंवा पिवळा असो, तयार होणारा फेस हा नेहमी पांढराच दिसतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.