मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कितीही पौष्टिक असली तरी 'या' लोकांनी अजिबात खाऊ नये मुगडाळ, होतो वाईट परिणाम

कितीही पौष्टिक असली तरी 'या' लोकांनी अजिबात खाऊ नये मुगडाळ, होतो वाईट परिणाम

काही लोकांसाठी चिंतेचे कारण बनू शकते. काही लोक ज्यांना काही विशिष्ट आजार किंवा त्रास आहेत. त्यांनी मुगडाळ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगतोय मुगडाळ कुणी खाऊ नये.

काही लोकांसाठी चिंतेचे कारण बनू शकते. काही लोक ज्यांना काही विशिष्ट आजार किंवा त्रास आहेत. त्यांनी मुगडाळ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगतोय मुगडाळ कुणी खाऊ नये.

काही लोकांसाठी चिंतेचे कारण बनू शकते. काही लोक ज्यांना काही विशिष्ट आजार किंवा त्रास आहेत. त्यांनी मुगडाळ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगतोय मुगडाळ कुणी खाऊ नये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनानंतर आता आपण सर्वजण आपल्या तब्येतीची जमेल तितकी जास्त काळजी घेतो. काय खावे? काय खाऊ नये? काय खाल्याने काय होईल? याचा आपण हल्ली बारकाईने विचार करतो. मात्र आपल्या घरात एक पदार्थ किंवा एक डाळ अशी असते, जी खाताना आपण जास्त विचार करत नाही. कारण ती डाळ कायम निरोगी आणि पौष्टिक अन्न म्हणून ओळखली जाते.

ती डाळ म्हणजे, मुगडाळ. होय, आता तुम्हीही म्हणाल मुगडाळ तर खरंच खूप पौष्टिक असते. एखाद्या रुग्णालाही डॉक्टर मुगडाळ खाण्याचा सल्ला आवर्जून देतात. मात्र हीच मुगडाळ काही लोकांसाठी चिंतेचे कारण बनू शकते. काही लोक ज्यांना काही विशिष्ट आजार किंवा त्रास आहेत. त्यांनी मुगडाळ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगतोय मुगडाळ कुणी खाऊ नये.

Fatty Liver : फॅटी लिव्हरच्या समस्येपासून मुक्त करेल ही औषधी वनस्पती, मिळतील अनेक फायदे

उच्च यूरिक ऍसिडची समस्या असलेल्या रुग्णन्नी खाऊ नये मुगडाळ

काही लोकांना युरिक अॅसिडची समस्या जास्त असते. अशा लोकांनी मुगडाळ खाणे टाळावे. कारण या डाळीमध्ये प्रोटिन्स मोठ्या प्रमाणावर असतात, ज्यामुळे शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढते.

किडनी स्टोन

ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास त्यांनी मूगडाळ खाऊ नये. मुगडाळीमध्ये ऑक्सलेट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरात किडनी स्टोन बनण्याचा धोका वाढतो. शरीरात ऑक्सलेट आणि प्रोटीनची पातळी वाढू नये म्हणून मुगडाळ खाणे टाळावे.

लो शुगर

काही लोकांना लो शुगर म्हणजेच कमी रक्तातील साखरेचा त्रास असतो. अशा रुग्णांनीही मुगडाळ खाणे टाळावे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मूग डाळीमध्ये असे अनेक घटक आढळतात, जे शरीरातील रक्तातील साखर आणखी कमी करतात. त्यामुळे लो शुगरचे त्रास असलेल्या रुग्णांनी मुगडाळ खाल्यास त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो.

या 5 प्रकारच्या बिया आहेत आरोग्यासाठी उपयोगी, नियमित सेवनाने मिळतील फायदे

अशा पद्धतीने कुणीही खाऊ नये मुगडाळ

मुगडाळ कायम चांगल्याप्रकारे शिवीजवूनच खावी. कच्ची किंवा किंवा अर्धवट शिजवलेली डाळ खाल्याने जुलाब म्हणजेच लूज मोशन्स आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे अंकुरलेली मुगडाळही कच्ची खाणे टाळा. ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे, त्यांच्यासाठी हे जास्त त्रासदायक ठरू शकते. या डाळीचे अतिसेवनदेखील हानिकारक आहे.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle