मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या 5 प्रकारच्या बिया आहेत आरोग्यासाठी उपयोगी, नियमित सेवनाने मिळतील फायदे

या 5 प्रकारच्या बिया आहेत आरोग्यासाठी उपयोगी, नियमित सेवनाने मिळतील फायदे

बियांचे आरोग्य फायदे

बियांचे आरोग्य फायदे

काही फळं आणि भाज्यांच्या बियांबाबत जाणून घेऊया. त्या आरोग्यासाठी का गरजेच्या आहेत हेसुद्धा यातून तुम्हाला कळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 27 नोव्हेंबर : अनेकदा फळं आणि भाज्यांच्या बियांकडे आपलं लक्ष जात नाही. मात्र, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यात आरोग्यासाठी आवश्यक असणारी खूप पोषकतत्त्व असतात. काही बिया आहारात समाविष्ट केल्या तर तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचं रक्षण करू शकता. या बियांमध्ये भरपूर तंतुमय पदार्थांसह महत्त्वाची जीवनसत्व, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.  यांच्या नियमित सेवनानं रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. सोबतच रक्तदाब कमी करण्यासही या बिया उपयुक्त ठरतात. फिट राहण्यासाठी आपल्या डाएटमध्ये या बिया नक्की घ्यायला सुरू करा. काही फळं आणि भाज्यांच्या बियांबाबत जाणून घेऊया. त्या आरोग्यासाठी का गरजेच्या आहेत हेसुद्धा यातून तुम्हाला कळेल.

जवसाच्या बिया (फ्लेक्ससीड)

जवसाच्या बिया रक्तदाब कमी करण्यात मदत करतात. सोबतच या बिया बद्धकोष्ठतेपासून सुटका देण्यास मदत करतात. रक्तातील साखरेची पातळी चांगली ठेवणं, शरीरावरची सूज कमी करणं यासाठीही या बिया मदतशील असतात. जवस फायबर आणि ओमेगा - 3 चा चांगला स्रोत आहे.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये खूप प्रथिनं, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट आणि लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, जस्तसुद्धा आढळतं. आपल्या आवडत्या पदार्थांमध्येही हे टाकून तुम्ही खाऊ शकता. सूज कमी करण्यासाठी हे मदत करतं. हृदयरोगाचा धोकाही यातून कमी होतो.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया फॉस्फरस, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा - 6 फॅट्सचा चांगला स्रोत आहेत. एका अभ्यासात असं सिद्ध झालं, की लघवीतील कॅल्शियमचं प्रमाण कमी करून मुतखड्याचा धोका भोपळ्याच्या बिया कमी करतात.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यात खूप प्रथिनं,  मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि इ जीवनसत्व असतं. या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.

हे वाचा - शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची काकडी का खाऊ नये? जाणून घ्या

तिळाच्या बिया

काळे तीळ खूप प्रमातलं फायबर आणि फॅटी ऍसिडमुळं बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयोगी असतात. यातलं तेल आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतं. तिळाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम खूप असतं. यातून रक्तदाब संतुलित राहतो.

First published:

Tags: Health, Health Tips