मुंबई, 27 नोव्हेंबर : हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयीदेखील बदललेल्या आहेत. त्यामुळे लोकंच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोच. त्यातच हल्ली मद्यपान कारणंही लोकांसाठी सामान्य झालं आहे. त्यामुळेही अनेक आजार होण्याचा धोका असतो. असाच एक आजार म्हणजे फॅटी लिव्हर डिसीज. आज आम्ही तुम्हाला या आजारापासून वाचण्यासाठी एक उपाय सांगणार आहोत.
अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासोबतच लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या लोकांसाठीही हे फायदेशीर आहे. फॅटी लिव्हरसाठी अश्वगंधा कसे आणि किती फायदेशीर आहे, हे जाणून घेऊया.
या 5 प्रकारच्या बिया आहेत आरोग्यासाठी उपयोगी, नियमित सेवनाने मिळतील फायदे
अश्वगंधा जडीबुटी आहे, जी भारत, आफ्रिका आणि मध्य पूर्व भागांमध्ये मिळते. अश्वगंधा बहुतेकदा तणाव आणि चिंता, निद्रानाश, संधिवात, नैराश्य इत्यादींपासून आराम मिळवण्यासाठी वापरली जाते. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अश्वगंधा अँटिऑक्सिडंटचा खजिना आहे. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते आणि पचनक्रिया वाढवते.
फॅटी लिव्हरसाठी फायदेशीर अश्वगंधा
लिव्हर आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव असतोय, हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लिव्हरला किंचितही इजा झाली तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशातच हल्ली फॅटी लिव्हरची समस्याही खूप लोकांना सतावते. या स्थितीत लिव्हरच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. मात्र अश्वगंधा तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून वाचवू शकते.
झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे, अश्वगंधा ही औषधी वनस्पती आपल्या लिव्हरसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अश्वगंधा फॅटी लिव्हरची समस्या दूर होईल आणि लिव्हरशी संबंधित इतर त्रासांपासूनही सुटका मिळेल. जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांचे लिव्हर हळूहळू कमजोर होऊ लागते. त्यानंतर त्यांना फॅटी लिव्हरसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हालाही असा काही त्रास असेल तर नियमित अश्वगंधा चूर्ण घ्या.
हिरवी मिरची आरोग्यासाठी ठरू शकते वरदान; फक्त जाणून घ्या खाण्याचे योग्य प्रमाण
लिव्हर खराब झाल्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. अश्वगंधाच्या सेवनाने लिव्हर खराब होण्यापासून वाचेल आणि त्याचे कार्यही योग्य प्रमाणे सुरु राहील. हल्ली कोणत्याही प्रकारचा आहार घेतल्यामुळे लिव्हरमध्ये विषारी पदार्थ जमा होण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे लिव्हरच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. मात्र अश्वगंधाचे नियमित सेवन केल्यास हानिकारक विषाचा प्रभाव कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Home remedies, Lifestyle