जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Hair Care Tips : केसांच्या घामामुळे टाळूला येणारी खाज त्वरित थांबवा, अशाप्रकारे करा मेथीचा वापर

Hair Care Tips : केसांच्या घामामुळे टाळूला येणारी खाज त्वरित थांबवा, अशाप्रकारे करा मेथीचा वापर

Hair Care Tips : केसांच्या घामामुळे टाळूला येणारी खाज त्वरित थांबवा, अशाप्रकारे करा मेथीचा वापर

पावसाळ्यात आपले केस निरोगी ठेवण्यासाठी लोक केसांची विशेष काळजी घेत असतात. असे असूनही केसांमध्ये घाम आणि घाण यामुळे डोक्यात खाज येण्याची समस्या सामान्य होते. मात्र डोक्याची खाज दूर करण्यासाठी मेथी तुमच्या खूप उपयोगी पडू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै : पावसाळ्यात केसांशी संबंधित काही समस्या सामान्य केसांची काळजी घेण्याचे नियम पाळल्यानंतरही होतात. या दरम्यान कोरडेपणामुळे केसांमध्ये कोंडा दिसू लागतो. त्याचबरोबर घामामुळे डोक्याला खाज सुटू लागते. अशा स्थितीत अनेक हेअर प्रोडक्ट्स वापरूनही डोक्यातील खाज जाणे कठीण होऊन बसते. मात्र तुमची इच्छा असल्यास काही सोप्या टिप्सच्या मदतीने खाज सुटलेल्या टाळूला अलविदा म्हणता येईल. खरंतर पावसाळ्यात आर्द्रतेमुळे केसांना खूप घाम येतो. त्यामुळे केस घाण आणि चिकट दिसू लागतात. यासोबतच टाळूलाही खाज सुटू लागते. अशा परिस्थितीत केस धुणे हा खाज थांबवण्याचा एकमेव उपाय असल्याचे दिसून येते. मात्र रोज केस धुणे केसांच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात टाळूला येणारी खाज मिटविण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. मेथी करेल कोरडेपणा दूर जर तुमचे केस कोरडे असतील आणि तुम्हाला पावसाळ्यात केसांना खाज येण्याचा त्रास होत असेल तर मेथीचे पाणी वापरणे तुमच्यासाठी उत्तम रेसिपी ठरू शकते. यासाठी 2 चमचे मेथी पाण्यात भिजवून रात्रभर राहू द्या. सकाळी मेथीचे पाणी गाळून घ्यावे. आता त्यात 1 कप कोरफडीचे जेल आणि 1 चमचे मध मिसळा आणि टाळूवर लावा आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

Relationship Tips : ‘हाच आहे माझा राजकुमार’, फक्त 3 गुणांवरून ओळखा Perfect Life Partner

तेलकट केसांवरही मेथी आहे गुणकारी मेथीच्या मदतीने तुम्ही तेलकट केसांच्या खाज येण्याच्या समस्येपासून त्वरित आराम मिळवू शकता. यासाठी 1 कप मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 कप ताक घाला. आता हे मिश्रण केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा. Sugar control: शुगर नियंत्रणात ठेवणं कोणालाही होईल सोपं; या घरगुती उपायांचा परिणाम आहे भारी खराब केसांपासून सुटका केसांची काळजी घेण्यासाठी मेथीचा वापर केल्याने तुम्ही टाळूची खाज मिटण्यासोबतच खराब केसांची समस्यादेखील दूर करू शकता. यासाठी 1 कप मेथी रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी पाणी गाळून घ्या. आता या पाण्यात 1 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 1 कप आवळा-रीठा-शिकाकाई पाणी मिसळा आणि टाळूला लावा, नंतर 1 तासानंतर केस धुवा. आठवड्यातून 1 दिवस हा उपाय केल्यास केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात