मुंबई, 17 जुलै : फळं आपल्याला हायड्रेट ठेवतात आणि खराब स्नॅक्स खाण्यापासून रोखतात. फळे फायबर, व्हिटॅमिन्स आणि इतर अनेक मिनरल्स यांचा चांगला स्रोत आहेत. कमी-कॅलरी फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे मधुमेह, जळजळ, हृदय समस्या आणि इतर आरोग्य परिस्थितींचा धोका कमी होतो. त्यामुळे फळं खाणं आपल्या रोग्यांसाठी फायद्याचेच असते. मात्र तेव्हाच जेव्हा तुम्ही फळे खाताना सामान्य चुका करत नसाल. मधुमेह शिक्षक म्हणून प्रमाणित असलेल्या पोषणतज्ञ आणि कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन फिजिशियन असलेल्या निहारिका बुधवानी यांनी फळे खाताना कोण कोणत्या चुका करतो आणि त्या का करू नये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून निहारिका यांनी सांगितले की, “प्री-कट फळे म्हणजे जास्त काळ चिरू ठेवलेली फळे खाणे, चवीसाठी मीठ शिंपडणे आणि आपल्या जेवणासोबत फळे खाताना काही कार्बोहायड्रेट कमी करणे यासारख्या काही सामान्य सवयी आपल्याला संपूर्ण पोषण मिळू देत नाहीत.” त्यांनी पुढे लिहिले, “फळे हे व्हिटॅमिन सीच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहेत. मात्र हे व्हिटॅमिन उष्णतेने कमी होते आणि हवेच्या संपर्कात आल्यावर ते सहज नष्ट होते. फळे खाण्यापूर्वी जास्त काळ चिरून ठेवलेली असतील तर त्यातून हे जीवनसत्व कमी होते. नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला फळ खायचे आहे तेव्हा ते कापा!” Sitting Work : डेस्क जॉब करणाऱ्यांना जास्त असतो हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञांनी सुचवले हे उपाय फळांवर मीठ किंवा मसाला घातल्याने काय होते? फळांवर मीठ, मसाला टाकून खाण्याबद्दल निहारिक यांनी सांगितले, “जर तुम्ही तुमच्या जेवणादरम्यान तुमचे एकूण कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण नियंत्रित करू शकत असाल तर तुम्ही जेवणादरम्यान फळाचा समावेश करू शकता. पण आपले जेवण (भारतीय जेवण) कर्बोदकांनी समृद्ध असल्याने, जेवणासोबत फळे समाविष्ट केल्याने त्या विशिष्ट जेवणातील कर्बोदक आणि कॅलरीचे प्रमाणदेखील वाढते.“
निहारिका यांनी सल्ला दिला की जर एखाद्याला जेवणासोबत फळे खायची असतील तर त्यांना आधी कार्बचे सेवन कमी करावे लागेल. “तुम्हाला जे फळ खायचे आहे ते खाण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारातील कार्ब्स कमी करावे लागतील.” Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने सांगितले चांगल्या झोपेचे सिक्रेट; झोपण्यापूर्वी घ्यावी ‘या’ दोन गोष्टींची काळजी म्हणून जर तुम्ही फळे चुकीच्या पद्धतीने खात असाल. तर तुम्हाला तुमच्या चुका दुरुस्त करून फळांमधील पोषक तत्वांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याची वेळ आली आहे.