जर तुम्हाला फिटनेससाठी प्रेरणेची गरज आहे तर तुमच्यासमोर एकच नाव आहे ते म्हणजे मिलिंद सोमण (Milind Soman). मिलिंद सोशल मीडियावर सक्रिय असून तो स्वतःचे फिटनेसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. 53 वर्षीय मिलिंदचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. दिवसागणिक त्याचं फिटनेससाठी असलेलं प्रेम पाहून त्याचे चाहते नव्याने मिलिंदच्या प्रेमात पडत आहेत. नुकताच त्याने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात तो अण्डरवॉटर रनिंग करताना दिसत आहे. यापेक्षाही विशेष म्हणजे त्याने अण्डरवॉटर रनिंग करताना पाठिवर 12 किलो वजन घेतले आहे.
हा फोटो शेअर करताना मिलिंदने लिहिले की, ‘10 दिवसांपूर्वी आयलंडमध्ये डाइव्हची तयारी करताना मी 12 किलोचं वजन पाठीवर घेतलं होतं. तयारी योग्य असेल तर काहीच अशक्य नाही. मग ते 2 अंश सेल्सियसमध्ये फ्री डाइव्ह मारणं का असेना.. तुमचं ध्येय समजून घ्या आणि त्याप्रमाणे काम करा. मग आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळेल.’
मिलिंद सोमणच्या या पोस्टवर त्याची पत्नी अंकिता कोनवरने ‘तू एक अफलातून माणूस आहे,’ अशी कमेन्ट केली. मिलिंद त्याच्या फिटनेसशी निगडीत अनेक पोस्ट शेअर करत असतो. त्याचं ट्रेनिंग आणि डाएट कसं असतं याबद्दलही तो सातत्याने सांगताना दिसतो. त्याचे पुश- अप मारतानाचे आणि रनिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
VIRAL VIDEO: या गावात दिसली सात तोंडी सापाची कात, लोकांनी वाहिलं हळद- कुंकू मेंदूशी निगडीत या 10 खोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल… देशातील या शहरातील लोक देतात सर्वाधिक कर, जाणून घ्या मुंबईचं स्थान हा ‘Jeasus Shoes’ काही मिनिटांत विकले गेले, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क