मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Migraine Ayurvedic Remedy : मायग्रेनचा त्रास सहन होत नाही? करा हे 5 आयुर्वेदिक उपाय, त्वरित मिळेल आराम

Migraine Ayurvedic Remedy : मायग्रेनचा त्रास सहन होत नाही? करा हे 5 आयुर्वेदिक उपाय, त्वरित मिळेल आराम

योगासने, पंचकर्म उपचार, विश्रांती तंत्र या आयुर्वेदिक उपायांचा वापर करून मायग्रेनचा त्रास कमी करता येतो. ही एक चांगली पद्धत आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

योगासने, पंचकर्म उपचार, विश्रांती तंत्र या आयुर्वेदिक उपायांचा वापर करून मायग्रेनचा त्रास कमी करता येतो. ही एक चांगली पद्धत आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

योगासने, पंचकर्म उपचार, विश्रांती तंत्र या आयुर्वेदिक उपायांचा वापर करून मायग्रेनचा त्रास कमी करता येतो. ही एक चांगली पद्धत आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्याचा उपचार सामान्यतः औषधे आणि जीवनशैलीतील बदलांनी केला जातो. आयुर्वेददेखील यावर जुना आणि मानला जाणारा उपचार आहे. आयुर्वेदात मायग्रेनच्या उपचारात हर्बल औषधाचा वापर केला जातो. ज्यामुळे मायग्रेनच्या वेदनांमध्ये आराम मिळतो. आयुर्वेद कोणत्याही आजारावर मन, शरीर आणि आत्मा एकत्र घेऊन उपचार करते.

आयुर्वेदिक तज्ञांचा असा विश्वास आहे की सजीवांमध्ये वायु, पाणी, आकाश, अग्नी आणि पृथ्वी 5 घटक असतात. हे घटक शरीरातील ऊर्जा, वात, पित्त आणि कफच्या समस्या तपासतात. अशा प्रकारे शरीराचे सर्व अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. आयुर्वेदात मायग्रेनच्या उपचारासाठी कोणते घटक वापरले जातात ते जाणून घेऊया.

इम्युनिटी बूस्टशिवाय आवळा ज्युस पिण्याचे आहेत भरपूर फायदे; यकृतही राहते निरोगी

मायग्रेनसाठी आयुर्वेदिक उपचार

रिलॅक्सेशन टेक्निक

healthline.com च्या मते, शरीर आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी विश्रांती तंत्राचा म्हणजेच रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर केला जातो. हे तंत्र शरीरातील वेदना, डोकेदुखी, रक्तदाब आणि तणाव कमी करतात आणि प्रतिबंध करतात.

पंचकर्म थेरपी

पंचकर्म थेरपीमध्ये शरीर शुद्ध होते आणि शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकली जातात. ज्यामुळे वेदना सारख्या गंभीर समस्या हळूहळू कमी होतात.

योगा

योगा ही एक जुनी प्रथा आहे. जी मन आणि शरीराला आराम देते. त्यामुळे शरीराला हलके वाटते. योगासनदेखील आपले रक्त परिसंचरण वाढवण्यास मदत करतात.

नियमित व्यायाम

नियमित व्यायामामुळे मायग्रेनचा प्रभाव कमी होतो. नियमित व्यायामाने, आपले शरीर एंडोर्फिन सोडते, जे नैसर्गिक वेदना कमी करणारे असतात. तणाव, अस्वस्थता आणि स्ट्रेससाठी हे सर्वात फायदेशीर आहे.

पथ्यादी

पथ्यादी हे विविध औषधी वनस्पतींच्या मिश्रणातून बनवलेले लिक्विड सप्लिमेंट आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर मायग्रेनच्या उपचारासाठी पथ्यादीमध्ये केला जातो, ज्यात दाहक-विरोधी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात.

Constipation Remedy : बद्धकोष्ठतेमुळे दिवसभर राहता त्रस्त? रात्री दुधात मिसळून प्या हा पदार्थ, त्रासातून व्हाल मुक्त

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health Tips, Home remedies, Lifestyle