मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Constipation Remedy : बद्धकोष्ठतेमुळे दिवसभर राहता त्रस्त? रात्री दुधात मिसळून प्या हा पदार्थ, त्रासातून व्हाल मुक्त

Constipation Remedy : बद्धकोष्ठतेमुळे दिवसभर राहता त्रस्त? रात्री दुधात मिसळून प्या हा पदार्थ, त्रासातून व्हाल मुक्त

लोक अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या गंभीरतेने घेत नाहीत आणि त्याकडे लक्ष देत नाहीत. मग पुढे जाऊन ही समस्या गंभीर रूप धारण करते. पोटाची नियमित साफसफाई न करणे अनेक आजारांचे मूळ बनते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 3 सप्टेंबर : जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलामुळे लोकांच्या पचनसंस्थेवर अनेक दुष्परिणाम होत आहेत. यामुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या होत आहे. लोक अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या गंभीरतेने घेत नाहीत आणि त्याकडे लक्ष देत नाहीत. मग पुढे जाऊन ही समस्या गंभीर रूप धारण करते. पोटाची नियमित साफसफाई न करणे अनेक आजारांचे मूळ बनते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि सोप्या उपायांचा अवलंब करू शकता.

रोज रात्री दुधात तूप मिसळून प्या

बद्धकोष्ठतेचा त्रास होता असलेल्या व्यक्तीला दिवसभर मनस्तापाचा सामना करावा. लागतो. त्याची दैनंदिन कामेही त्याला व्यवस्थित पार पडता येत नाहीत. त्यामुळे त्याचा सर्व दिवस खूप वाईट जातो. मात्र एका सोपया उपायाने तुम्ही हा दिवसभर होणार मनस्ताप थांबवू शकता. रात्री एक ग्लास दुधात एक चमचा तूप मिसळून प्यायल्यास पचनक्रिया पूर्णपणे बरी होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. दूध हे संपूर्ण अन्न मानले जाते. ज्यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्व आढळतात. तर तुपामध्ये नॅच्युरल फॅट्स असतात. दूध आणि तूप यांचे मिश्रण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

इम्युनिटी बूस्टशिवाय आवळा ज्युस पिण्याचे आहेत भरपूर फायदे; यकृतही राहते निरोगी

भरपूर पाणी प्या

अनेकवेळा कामात गुंतलेले असताना आपण पाणी पिणे विसरतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे बद्धकोष्ठतादेखील होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी आपण शरीराच्या गरजेनुसार पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे.

फायबर युक्त आहार घ्या

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांना फायबर युक्त तृणधान्ये घेण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक फायबर युक्त आहार खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहते.

जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारण

नियमित व्यायाम करा

व्यायामाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते. परंतु यासंबंधीच्या अभ्यासात संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. व्यायामाचा आतड्यांच्या हालचालींशी काहीही संबंध नसल्याचंही अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. मात्र काही लोकांसाठी व्यायामामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle