मुंबई, 03 सप्टेंबर : आवळा हे हिरवट रंगाचे तुरट आणि आंबट फळ असून त्याचा औषधी म्हणून उपयोग होतो. आवळ्याचे चुरण, लोणचे, कँडी आणि जाम बनवून सेवन केले जाते. कच्चा आवळा किंवा त्याचा रस निरोगी राहण्यासाठी उत्तम मानला जातो. आवळा स्वादिष्ट असण्यासोबतच त्याचे असंख्य फायदे आहेत. आवळा रस पौष्टिक आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया मजबूत होते. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती पातळी वाढवण्यासाठी आवळ्याचा रस फायदेशीर मानला जातो. कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी आवळा रस उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे आवळ्याच्या रसाचे इतरही अनेक फायदे आहेत, त्याविषयी जाणून (Health Benefits of Amla Juice) घेऊया. आवळा रसाचे आरोग्य फायदे : प्रतिकारशक्ती वाढते - हेल्थलाइनच्या माहितीनुसार, आवळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. अँटी-ऑक्सिडंट म्हणून त्याचा उपयोग होतो प्रत्येक आवळ्यामध्ये 600 ते 700 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह प्रभावांपासून वाचवते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. यकृतासाठी फायदेशीर - आवळ्याचा रस अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे आणि हा रस शरीराचे वजन तसेच यकृतावरील चरबी कमी करण्याचे काम करतो. पचनशक्ती सुधारते - आवळ्यामध्ये अतिसारविरोधी गुणधर्म आहेत जे पोटात पेटके, अस्वस्थता, स्नायूंच्या कमकुवतपणापासून बचाव करण्यास उपयुक्त आहे आणि आवळ्याच्या रसामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट पोटातील अल्सर बरे करतात तसेच पचन सुधारतात. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त - आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत आणि आवळा, नारळ पाणी आणि सेलेनियमचे सिरम सतत 90 दिवस केसांना लावल्याने केसांची घनता वाढते. हे वाचा - जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारण किडनी निरोगी राहते - आवळ्याच्या रसामध्ये असलेले पोषक घटक किडनीच्या आरोग्याची काळजी घेतात आणि आवळा अर्क ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून मूत्रपिंडाच्या अकार्यक्षम क्रियाकलापांना प्रतिबंधित करते. हे वाचा - चित्रपटासाठी अभिनेत्यानं कमी केलं 18 kg वजन; आता ओळखणंही झालं कठीण (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैदयकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.