ब्रिटन, 20 ऑगस्ट : अलीकडे चुकीची जीवनशैली (Lifestyle), पोषक आहार तसंच व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. या गोष्टींचा थेट परिणाम विशेषतः पुरुषांच्या लैंगिक जीवनावर (Sex Life) झाल्याचं दिसून येत आहे. ताण-तणाव, चुकीची जीवनशैली, योग्य आहाराचा अभाव आणि मानसिक समस्यांमुळे आज अनेक पुरुषांना वयाच्या तिशी, चाळीशीतच लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यांना सेक्ससाठी थेरेपी (Sexual therapy) घ्यावी लागत आहे. पुरुषांच्या सेक्स ड्राईव्हमध्ये (Sex Drive) टेस्टोटेरॉन (Testosterone) हा हॉर्मोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मात्र टेस्टोटेरॉनची पातळी कमालीची घटल्यास संबंधित पुरुषाला इरेक्टाइल डिस्फंक्शन या समस्येचा सामना करावा लागतो. या हॉर्मोनची पातळी घटल्यामुळे स्नायू कमजोर होतात तसंच त्याचा परिणाम मानसिकतेवर होतो. एका अभ्यासानुसार, गेल्या काही वर्षात वाढत्या वयामुळे या हॉर्मोनच्या पातळीत कमालीची घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकी (America) शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 1987 मधील 60 वर्षे वयाच्या पुरुषांच्या तुलनेत 2004 मध्ये याच वयोगटातील पुरुषांमधील टेस्टोटेरॉनची पातळी 17 टक्क्यांनी घटल्याचं दिसून आलं आहे. युरोपियन देशांमध्ये देखील ही समस्या प्रकर्षानं जाणवत आहे. त्यामुळे अनेक पुरुष टेस्टोटेरॉन रिप्लेसमेंट थेरपी (Testosterone Replacement Therapy) घेण्यास प्राधान्य देत आहेत. हे वाचा - Private part मध्ये टाकले राजमा आणि…; लैंगिक सुखासाठी भलताच प्रयोग महागात कमी टेस्टोटेरॉनमुळे लैंगिक समस्यांचा सामना केलेले यूकेतील एलिस्टेयर केनेट यांनी 2018 मध्ये ऑप्टिकल नावाची कंपनी स्थापन केली आहे. येथे पुरुषांना टेस्टोटेरॉन रिप्लेसमेंट थेरेपी दिली जाते. आमच्याकडे ही थेरपी घेण्यासाठी 27, 28 वर्षीय युवक येत आहेत. वयाच्या 30 ते 40 वयोगटातील पुरुषांमध्ये प्रामुख्याने टेस्टोटेरॉनची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. याला पुरुषांमधील मेनोपॉजही म्हणता येईल. यामुळे पुरुषांमध्ये ब्रेनफॉग (Brain Fog), कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणं, बॉडी रॅशेस अशी लक्षणे दिसून येतात असं एलिस्टेयर केनेट यांनी सांगितलं. ही थेरपी देण्यापूर्वी संबंधित तरुणाची प्रथम रक्त तपासणी केली जाते. हॉर्मोनची पातळी जास्त प्रमाणात घटलेली असेल तरच त्याला ही थेरेपी दिली जात असल्याचं केनेट यांनी सांगितलं. या थेरेपीत जेल, पॅच आणि नियमित इंजेक्शनच्या माध्यमातून वय आणि गरजेनुसार सिथेंटिक हॉर्मोन दिले जातात. याचा सकारात्मक परिणाम 6 ते 8 आठवड्यांत दिसून येतो. ही थेरपी घेतल्यानंतर माझं आयुष्य बदललं, माझा विवाह मोडणार होता परंतु, तसे झाले नसल्याच्या प्रतिक्रिया रुग्ण देत असल्याचं केनेट यांनी सांगितलं. ही समस्या उदभवू नये यासाठी योग्य जीवनशैली ठेवत सकस आहार घेण्यावर भर द्यावा, असं केनेट यांनी सांगितलं. हे वाचा - रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब,CCTV पाहिला तर धक्का बसला आज यूकेतील अनेक तरुण टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी घेत आहेत. लंडनमधील डॅनियल केलीने द सनशी बोलताना सांगितले की मी वयाच्या 28 व्या वर्षीच ही थेरपी घेत आहे. टेस्टोस्टेरॉनची पातळी घटल्याने त्याचा नकारात्मक परिणाम मला जाणवला. माझी लैंगिक इच्छा कमी झाली. माझ्या शरीरातील ऊर्जा संपल्यासारखं मला वाटत होतं. यामुळे मला तणाव आणि डिप्रेसिव्ह वाटत होतं. फिटनेसमध्ये समस्या जाणवू लागली. आठवड्यातून 3 ते 4 वेळा जीममध्ये व्यायाम करुनही कोणताही परिणाम जाणवत नव्हता. या गोष्टींचा संबंध टेस्टोस्टेरॉनशी आहे हे मला माहिती नव्हते. एक दिवस मी रक्त तपासणी केली असता, माझी टेस्टोस्टोरॉन पातळी एखाद्या 80 वर्षाच्या व्यक्ती इतकी आहे हे मला समजलं. त्यानंतर डॉक्टरांशी संपर्क करून मी ही थेरपी घेणं सुरू केली. ही थेरपी घेतल्यानं माझ्यात खूप सुधारणा झाली, माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझा सेक्स ड्राईव्ह देखील सुधारला असं डॅनियल म्हणाला. आता डॅनियल हेल्थ आणि फिटनेस कोच आहे. ही थेरेपी मी दीर्घकाळ घेणार आहे. ही थेरपी घेताना आलेल्या अनुभवांवर मी एक पुस्तक लिहिलं आहे असं त्याने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.