जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Private part मध्ये टाकले Kidney Beans आणि...; लैंगिक सुखासाठी भलताच प्रयोग महागात

Private part मध्ये टाकले Kidney Beans आणि...; लैंगिक सुखासाठी भलताच प्रयोग महागात

लैंगिक सुखासाठी तरुणाचा नको तो उद्योग.

लैंगिक सुखासाठी तरुणाचा नको तो उद्योग.

सेक्शुअल प्लेजरसाठी राजमा प्रायव्हेट पार्टमध्ये (Kidney Beans in Private Part) टाकण्याचा प्रयोग त्याच्या चांगलाच अंगलट आला.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    वॉशिंग्टन, 20 ऑगस्ट : लैंगिक आनंदासाठी (Sexual Pleasure) बाजारात विविध प्रकारची उपकरणे उपलब्ध असतात. अशी उपकरणं उपलब्ध असतानाही काही लोक विचित्र प्रयोग करायच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. नुकताच अमेरिकेत (America) असाच एक प्रकार समोर आला आहे. सेक्शुअल प्लेजरसाठी एका युवकानं चक्क राजमा प्रायव्हेट पार्टमध्ये (Kidney Beans in Private Part) टाकले. त्याचा हा विचित्र (Weird Sex Experiment) प्रयोग त्याच्या चांगलाच अंगलट आला. सेक्शुअल प्लेजर किंवा लैंगिक आनंदासाठी अमेरिकेतील मिशिगन येथील 30 वर्षीय एका युवकाने विचित्र प्रकार अवलंबला. या व्यक्तीने लैंगिक आनंदासाठी चक्क राजम्याचा (Beans) वापर केला. पण दुर्देवानं हे 6 दाणे त्या व्यक्तीच्या पेनिसमध्ये (Penis) अडकून बसले. मिशिगन येथील स्पॅरो हॉस्पिटलमध्ये या व्यक्तीला दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. त्याला मूत्रविसर्जन (Urine) करणं अशक्य झालं होतं. अशा स्थितीत त्याची तपासणी केली असता त्या व्यक्तीच्या पेनिसमध्ये राजमाचे 6 दाणे अडकून बसल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. या व्यक्तीवर शस्त्रक्रिया (Surgery) करावी लागली. हे वाचा -  Contraceptive Pillमुळे टाळते प्रेग्नन्सी; घेण्यापूर्वी दुष्परिणामांची तयारी ठेवा स्पॅरो हॉस्पिटलचे डॉ.मार्गो डेनिस यांनी सांगितलं की, या व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या मूत्रमार्गातील नलिकेत राजमाचे 6 दाणे अडकून बसल्याचे दिसले. या व्यक्तीने घरीच स्वतःवर उपचार करत हे दाणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही आणि त्याची प्रकृती अधिकच बिघडली. ही व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याच्याकडे आम्ही फारशी चौकशी न करता तातडीने उपचार सुरू केले. आमच्या टीमने तातडीने शस्त्रक्रिया करत या व्यक्तीच्या पेनिसमध्ये अडकलेले राजमाचे 6 दाणे काढून टाकले आणि त्याचा जीव वाचवला. किरकोळ शस्त्रक्रिया आणि उपचारांनंतर आता या व्यक्तीची प्रकृती सुधारली असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. हे वाचा -  मुलगी 21 वर्षांची होताच टॉपलेस होत करतात व्हर्जिनिटी पार्टी; विचित्र प्रथा उपचार पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीला असा प्रकार करण्याबाबत विचारलं असता, मी प्रयोग करत होतो, असं उत्तर त्याने दिले. त्याचं हे उत्तर ऐकून डॉक्टरही हैराण झाले. एक प्रयोग म्हणून केलेली ही विचित्र कृती वेळेत उपचार मिळाले नसते तर या व्यक्तीच्या जीवावर बेतली असती, असं डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे जरी खासगी आयुष्य असलं तरीही कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करणं अत्यंत गरजेचं असतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात