मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लक्ष द्या! रडू आल्यास अश्रूंना वाट करून द्या मोकळी; थांबवून ठेवल्यास होऊ शकतात आजार

लक्ष द्या! रडू आल्यास अश्रूंना वाट करून द्या मोकळी; थांबवून ठेवल्यास होऊ शकतात आजार

अश्रू थांबवून ठेवल्यास आजार होऊ शकतात

अश्रू थांबवून ठेवल्यास आजार होऊ शकतात

जेव्हा रडू येतं त्या वेळी अश्रूंना वाट मोकळी करून देणं हे आरोग्यासाठी (Health) चांगलं असतं, असं तज्ज्ञ सांगतात

    मुंबई, 07 डिसेंबर:  रडू येणं (Crying) ही अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक गोष्ट आहे. शारीरिक दुखापत झाल्यास, एखादी दुःखद घटना घडल्यास किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास माणसाला रडू येतं. रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे आपला कमकुवतपणा लपवण्यासाठी काही जण डोळ्यांतले अश्रू (Tears) रोखून धरतात. परंतु, जेव्हा रडू येतं त्या वेळी अश्रूंना वाट मोकळी करून देणं हे आरोग्यासाठी (Health) चांगलं असतं, असं तज्ज्ञ सांगतात. कारण रडणं रोखून धरणं हे अनेक आजारांना (Disease) आमंत्रण देणारं ठरू शकतं.

    रडू येतं तेव्हा ते रोखल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आयुर्वेदात (Ayurveda) रडणं या क्रियेविषयी विस्तृत विवेचन करण्यात आलं आहे. रडताना डोळ्यांतून अश्रू येतात. त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा (Dryness) दूर होतो. तसंच डोळ्यांतले जंतू बाहेर टाकले जातात. परिणामी डोळ्याचं आरोग्य सुधारतं. याव्यतिरिक्त रडण्याचे आणखीही काही फायदे आहेत. याविषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

    आयुर्वेद असं म्हणतो, की डोळ्यांतून येणारे अश्रू कधीही रोखू नयेत. कारण जेव्हा रडू येतं, तेव्हा ते रोखल्यामुळे डोकेदुखी, नाकाचे आजार, डोळ्यांचे आजार आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेव्हा रडू येतं, तेव्हा अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी. यामुळे हृदयविकाराचा, तसंच डिप्रेशनचा (Depression) धोका कमी होतो.

    Skin Care Tips : त्वचा विकारांवर कडुलिंबाची पानं ठरतात गुणकारी

    डोळ्यांत कचरा किंवा घाण जाते, तेव्हा आपल्या डोळ्यांतून पाणी येतं. तसंच भावनिक (Emotional) कारणांनी किंवा मनाला दुःख, वेदना झाल्यास, आनंद झाल्यास, भावनाविवश झाल्यास डोळ्यातून पाणी येतं. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंमध्ये 98 टक्के पाणी (Water) असतं. त्यामुळे कोणत्याही कारणानं रडू आल्यास ते रोखू नये. कारण रडल्यामुळे शरीरात ऑक्सिटॉक्सिन आणि एन्डॉर्फिनसारखी रसायनं तयार होतात. ही रसायनं आनंद निर्माण करणारी असतात. तणावामुळे जेव्हा आपण रडतो तेव्हा अश्रूंच्या माध्यमातून विषारी द्रव्यं हळहळू शरीराबाहेर टाकली जातात. तसंच अश्रूंमुळे शरीरात काही हॉर्मोन्स (Hormones) स्रवतात. ही हॉर्मोन्स शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली असतात. रडल्यामुळे डोळ्यांतलं वंगण कायम राहतं आणि संसर्गाचा धोका कमी होतो. अश्रूंमुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. तसंच डोळ्यांतले जीवजंतू नाहीसे होतात.

    त्यामुळे कोणत्याही कारणामुळे रडू आल्यास आपले अश्रू रोखू नका. अश्रू रोखून तुम्ही मोठ्या शारीरिक समस्यांना आमंत्रण देत आहात, हे लक्षात ठेवा. अश्रूंना वाट मोकळी करून देणं हे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे.

    First published:
    top videos

      Tags: Health Tips, Lifestyle