मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health News: थंडीच्या मोसमात ताक प्यायल्यानं प्रतिकारशक्ती होते बूस्ट; जाणून घ्या त्याचे अनेक फायदे

Health News: थंडीच्या मोसमात ताक प्यायल्यानं प्रतिकारशक्ती होते बूस्ट; जाणून घ्या त्याचे अनेक फायदे

Health benefits of Buttermilk : थंडीच्या दिवसात ताक पिणं अनेक लोक टाळतात. पण हे बहुगुणी पेय सगळ्या ऋतूंमध्ये गुणकारी असतं. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे.

Health benefits of Buttermilk : थंडीच्या दिवसात ताक पिणं अनेक लोक टाळतात. पण हे बहुगुणी पेय सगळ्या ऋतूंमध्ये गुणकारी असतं. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे.

Health benefits of Buttermilk : थंडीच्या दिवसात ताक पिणं अनेक लोक टाळतात. पण हे बहुगुणी पेय सगळ्या ऋतूंमध्ये गुणकारी असतं. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर : दुधापासून बनणारा ताक हा एक उपपदार्थ आहे. ताक अतिशय हलकं आणि आम्लयुक्त असते. लोक ताक सहसा काळे मीठ, जिरे टाकून पितात. ताक प्यायला खूप चविष्ट आहे. ताक हे पारंपरिक पद्धतीनं बनवले तर त्याचे अधिक फायदे होतात. आजकाल ताक यंत्रांद्वारेही बनवले जात असल्यानं त्यात चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता असते. ताकामध्ये असलेले निरोगी बॅक्टेरिया, कार्बोहायड्रेट्स आणि लॅक्टोज रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात. रिकाम्या पोटी ताक पिण्याचे भरपूर फायदे (Health benefits of Buttermilk) आहेत.

Femina.in च्या बातमीनुसार, ताक कसेही तयार केले तरी त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जेवणासोबत ताक नियमित सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. ताक आम्लपित्त दूर करते आणि हाडेही मजबूत करते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया ताकाचे काय फायदे आहेत-

ताकाचे फायदे

पचनशक्ती मजबूत राहते

ताक हे प्रोबायोटिक आहे, म्हणजे ताकामध्ये निरोगी जीवाणू आढळतात. पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यात निरोगी जिवाणूंचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे ताक देखील अन्न पचण्यास आणि बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यास खूप मदत करते.

अ‌ॅसिडिटीमध्ये प्रभावी

चांगले बॅक्टेरिया पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध करतात, ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवत नाही. ताकामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे पोटातील पोषक तत्वांचे पचन लवकर होते. अशा प्रकारे ताक खाल्ल्याने अॅसिडिटीपासून बराच आराम मिळतो.

हाडे मजबूत होतात

ताकामध्ये व्हिटॅमिन डी असते, ज्यामुळे कॅल्शियमचे शोषण सुलभ होते. ताक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये ताक सेवन करणे फायदेशीर मानले जाते. रोज रिकाम्या पोटी ताकाचे सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.

हे वाचा - बांगलादेशातून 5000 मुलींना भारतात आणून बनवलं वेश्या; मुंबईला अड्डा बनवणारा नराधम अखेर जेरबंद

कोलेस्ट्रॉल कमी

ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ताकामध्ये विशेष प्रकारचे बायोमोलेक्यूल्स आढळतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. याशिवाय, ताकामध्ये असलेल्या सक्रिय प्रोटीनमध्ये कर्करोगविरोधी, बॅक्टेरियाविरोधी आणि विषाणूविरोधी प्रभाव असतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हे वाचा - प्रियांका चोप्राचा पती निक जोनस ‘या’ गंभीर आजाराने आहे त्रस्त; 16 वर्षांपासून देतोय झुंज

वजन कमी करण्यास मदत होते

ताकामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ताक ही अतिशय सोपी रेसिपी आहे. याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे फॅट बर्नरचे काम करते आणि वजन नियंत्रित ठेवण्याचे काम सहज करते.

First published:

Tags: Health, Health Tips