Home /News /lifestyle /

Amla Seed Benefits - आवळ्याच्या बियाही आहेत गुणकारी; फायदे वाचाल तर कधीच फेकणार नाही

Amla Seed Benefits - आवळ्याच्या बियाही आहेत गुणकारी; फायदे वाचाल तर कधीच फेकणार नाही

आवळ्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल (Medicinal Properties Of Amla) जवळपास सर्वांचा माहित असते. मात्र आवळ्याच्या बियादेखील तितक्याच उपयुक्त असतात (Health Benefits of Amla Seeds) हे फार कमी लोकांना माहित आहे.

    मुंबई, 29 मे : आपल्याकडे घरगुती उपाय करण्याचे प्रमाण जास्त आहे. घरात वापरले जाणारे फळं, भाज्या, मसाले यांच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. छोट्या छोट्या आजारांवर हे उपयुक्त ठरतात. यातीलच आवळा हे फळ असे आहे, ज्याच्यामध्ये अगणित औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Amla) आहेत. आवळा हा विशेषतः केसांच्या मजबूतीसाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी वापरला जातो. मात्र आवळ्यामध्ये यापेक्षाही आणखी खूप औषधी गुणधर्म आहेत. आवळ्याच्या बियांमध्येही (Indian Gooseberry Seeds) औषधी गुणधर्म असतात. आज आपण आवळ्याच्या बियांच्या गुणधर्माबद्दल जाणून घेणार आहोत. हेही वाचा... Anemia Symptoms: लोहाच्या कमतरतेमुळे होतो अ‍ॅनिमिया, जिवालाही निर्माण होऊ शकतो धोका! काय असतात लक्षणं? आवळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, कॅरोटीन, लोह आणि फायबर यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्व आढळतात (Amla Seeds Contain Vitamin B Complex, Calcium, Potassium, Carotene, Iron And Fiber.). आवळ्याच्या बिया वाळवून त्याची पावडर तयार केली जाते. ही आवळ्याच्या बियांची पावडर (Amla Seed Powder) अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन (Indigestion) किंवा आम्लपित्ताची समस्या असेल तर आवळ्याच्या बियांपासून बनवलेले पावडर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल (Health Benefits of Amla Seeds). यासाठी हे पावडर कोमट पाण्यात टाकून प्यावे. आवळ्याच्या बियांचा वापर तुम्ही त्वचेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठीदेखील करू शकता. जर तुम्हाला पिंपळे किंवा मुरुमांची समस्या असेल तर आवळ्याच्या वाळवलेल्या बिया खोबरेल तेलात टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत त्या ठिकाणी लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. हेही वाचा... बाळ चालायला शिकतंय? मग अशा पद्धतीने घ्या आपल्या चिमुकल्याची काळजी उन्हाळ्यात आपल्याला अनेक त्रासाचं सामना करावा लागतो. यामध्ये बऱ्याचदा वनकातून रक्त येणे ही समस्या जास्त वाढते. अशा परिस्थितीत आवळ्याच्या बियांपासून बनवलेल्या पावडरची पेस्ट तयार करून ती डोक्याला लावावी. त्यामुळे तुम्हाला अराम मिळतो. बऱ्याचदा मसाल्याचे पदार्थ खाल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे उचकी लागते. ही उचकी थांबवण्यासाठी आवळ्याच्या बियांची पावडर आणि मध एकत्र करून खावा. यामुळे उचकीपासून लवकर आराम मिळतो. आवळा हे फळ विविध औषधे तयार करण्यासाठी वापरले जाते. आवळ्यापासून तयार केलेली औषधे अशक्तपणा, पिंपल्स, जुलाब, दातदुखी आणि ताप यावर उपचार करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरली जातात.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Superfood

    पुढील बातम्या