
नेहमी सोबत राहा : बाळ जेव्हा चालायला शिकत असेल, तेव्हा नेहमी त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत मुलांना एकटं सोडणं धोकादायक आहे. कारण चालताना मूल कधीही पडू शकतं. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता असते.

घरात चटई किंवा कारपेट टाका : मुलं जेव्हा नवीन चालायला शिकतात, तेव्हा घरात गालिचा किंवा चटई टाकून मुलांना त्यावर चालायला शिकवा. लक्षात ठेवा की, मुलांना गुळगुळीत किंवा खडबडीत जमिनीवर अजिबात सोडू नका. मुलांना गुळगुळीत जमिनीवर घसरण्याची भीती असते. तर, खडबडीत जमिनीमुळे मुलांच्या नाजूक पायांना इजा होऊ शकते. (Image/ Canva)

वॉकर दूरच ठेवा : मुलं चालायला शिकत असताना वॉकरला मुलांपासून दूर ठेवणं चांगलं. वॉकर पाहून मुलं वॉकरमध्ये चालण्याचा हट्ट करू लागतात. त्यामुळे, मुलांना वॉकरची सवय होते आणि ते लवकर चालायला शिकू शकत नाहीत.

पायांचा मसाज महत्त्वाचा : लहान मुलांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी संपूर्ण शरीराला मसाज करणं आवश्यक असलं, तरी मुलं जेव्हा चालायला शिकतात, तेव्हा त्यांच्या पायाला दररोज मसाज करा. त्यामुळे मुलांच्या पायांना त्यांच्या शरीराचं वजन सांभाळता येऊ लागतं आणि मुलं लवकर चालायला लागतात. तसंच, मसाजसाठी खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल चांगलं. याशिवाय, तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.

चालण्यात मदत : जेव्हा बाळ पहिल्यांदा चालायला शिकतं, तेव्हा त्याला तुमच्या मदतीची सर्वाधिक गरज असते. अशा परिस्थितीत मुलाला हात धरून हळूहळू चालायला शिकवा. मुलाला दररोज चालण्याचा सराव करायला दिल्यानं मूल काही दिवसात चांगलं चालायला शिकेल. (अस्वीकरण: या लेखात दिलेल्या माहितीची मराठी न्यूज 18 हमी देत नाही. हे लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)




