Home /News /lifestyle /

Anemia Symptoms: लोहाच्या कमतरतेमुळे होतो अ‍ॅनिमिया, जिवालाही निर्माण होऊ शकतो धोका! काय असतात लक्षणं?

Anemia Symptoms: लोहाच्या कमतरतेमुळे होतो अ‍ॅनिमिया, जिवालाही निर्माण होऊ शकतो धोका! काय असतात लक्षणं?

अनेकवेळा आपण सकस आहार घेतो, काही शारीरिक व्यायाम करतो आणि पुरेशी झोपदेखील घेतो. मात्र यादरम्यान आपण आपल्या आहारात आयर्न समाविष्ट करायला विसरतो. मात्र आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची (Iron Deficiency Can Cause Anemia) समस्या उद्भवू शकते

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 मे : आपलं आरोग्य उत्तम राहावं, आपल्यालाही इत्तर सर्वांप्रमाणे हव्या त्या गोष्टी करता याव्यात आणि त्यासाठी आपल्या शरीरारात ऊर्जा असावी. अशी सर्वांची इच्छा. असते. परंतु सर्वचजण याबाबत पुरेसे जागरूक नसतात किंवा त्यांना तेवढी माहिती नसते. मात्र आपल्या शरीराला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे हे सर्वांना माहित असलं पाहिजे. आपल्या शरीराला योग्य आहार, मुबलक प्रमाणात पाणी, पुरेशी झोप याव्यतिरिक्त सर्व व्हिटॅमिन आणि मिनरल्सची (Vitamins And Minerals) आवश्यकता असते. त्याचप्रमाणे लोह म्हणजेच आयर्न (Iron) या पोषक तत्वाचीदेखील गरज असते. अनेकवेळा आपण सकस आहार घेतो, काही शारीरिक व्यायाम करतो आणि पुरेशी झोपदेखील घेतो. मात्र यादरम्यान आपण आपल्या आहारात आयर्न समाविष्ट (Iron In Food) करायला विसरतो. आपल्या आहारात आयर्न पुरेशा प्रमाणात नसेल तर त्यामुळे अशक्तपणा, थकवा तसेच अ‍ॅनिमियाची (Anemia) समस्या उद्भवू शकते. आज आम्ही तुम्हाला अ‍ॅनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. हेही वाचा... Haldi Tips: हळद लावताना अनेकांकडून होतात या चुका; उन्हाळ्यात स्कीन प्रॉब्लेम वाढू लागतात काय आहे अ‍ॅनिमिया अ‍ॅनिमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराच्या रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात निरोगी लाल रक्तपेशी (Red Blood Cells) नसतात. या लाल रक्तपेशी शरीरातील टिश्यूपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात. मात्र जेव्हा शरीराला आयर्न अपुरे पडते तेव्हा अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता असते (Iron Deficiency Leads To Anemia). आयर्नच्या कमतरतेमुळे येणारा अशक्तपणा म्हणजेच अ‍ॅनिमिया रक्त पुरवठ्याच्या कमतरतेमुळे आणि आहारात आयर्नयुक्त पदार्थ नसल्यामुळे होतो. आयर्न हे शरीराच्या विकासासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. कारण ते हिमोग्लोबिन (Hemoglobin), मायोग्लोबिन (Myoglobin) आणि काही हार्मोन्स (Hormones) बनवते. आयर्नच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अ‍ॅनिमियाची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात. मात्र ही कमतरता वेळीच भरून न निघाल्यास अ‍ॅनिमियाची समस्या गंभीर होऊ शकते. अ‍ॅनिमियाची लक्षणे आपल्या शरीरात आयर्नचे प्रमाण कमी झाले असल्यास किंवा आपल्याला अ‍ॅनिमिया झाला असल्यास, काही लक्षणांद्वारे (Symptoms Of Anemia) आपल्याला ते कळू शकते. अ‍ॅनिमियामध्ये अशक्तपणा येणे, डोके दुखणे, छातीत दुखणे, जास्त प्रमाणात थकवा जाणवणे ही ही लक्षणे दिसतात. हेही वाचा... आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही मशरूमचा असा होतो उपयोग; जाणून घ्या सर्व फायदे अ‍ॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी असा असावा आहार तुमच्या रोजच्या आहारामध्ये आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करून तुम्ही अ‍ॅनिमियाचा (Iron Rich Food Can Reduce Anemia Risk) धोका कमी करू शकता. आहारात आयर्नचे दोन स्त्रोत असतात. हेम (Heme Iron) आणि नॉन-हेम आयर्न (Non-Heme Iron). हेम आयर्न आपल्याला मांस आणि सीफूड सारख्या प्राण्यांच्या उत्पादनांमधून मिळू शकते. हे आयर्न आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते. नॉन-हेम आयर्न पालेभाजी सारख्या वनस्पती स्रोतांपासून मिळते. हेम आयर्नच्या तुलनेत नॉन हेम आयर्न आपल्या शरीरात तितके चांगले शोषले जात नाही. अंडी, बीफ, मांस आणि मांस यकृत, टुना फिश, ऑयस्टर आणि शिंपले हे सर्व हेम आयर्नचे स्रोत आहेत. तर मसूर डाळ, बीन्स, नट आणि बिया, पालक आणि हिरव्या भाज्या, कडधान्य हे नॉन-हेम आयर्नचे स्रोत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात आयर्न व्यवस्थित शोषले जावे यासाठी काही घटक आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी हा मुख्य घटक आहे (Vitamin C Can Absorbs Iron In Blood). व्हिटॅमिन सीमुळे नॉन-हेम आयर्न जास्त चांगल्या प्रकारे शोषले जाते. व्हिटॅमिन सीचे काही स्त्रोत म्हणजे फुलकोबी,ब्रसेल्स स्प्राउट्स, टरबूज, लिंबू, मोसंबी, संत्री, ब्रोकोली, आणि सर्व प्रकारच्या बेरीज म्हणजेच स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी. त्याचबरोबर बटाटे, टोमॅटो, अननस आणि खरबूज हेदेखील शरीरात आयर्न शोषण्यास मदत करतात. शरीरात पुरेशा प्रमाणात आयर्न असल्यावर अ‍ॅनिमियाचा त्रास कमी होतो आणि संभाव्य धोका टळतो.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Food, Health Tips

    पुढील बातम्या