मुंबई, 28 जानेवारी : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतांशी लोकांना आपल्या शरीरासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुले कमी वयातच अनेकांना वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले आहे. अशा स्थितीत निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्यासाठी आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. न्यूयॉर्कमधील बर्गन युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या आयुर्मान काय परिणाम होतो यावर संशोधन केले आहे. हा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी मांसाहार करणार्यांना त्यांच्या आहारात लाल मांस, चिकन आणि इतर प्रकारचे प्रक्रिया केलेले पदार्थ समाविष्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. हे मांस लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोगाचे कारण बनते. ते अतिप्रमाणात खाल्ल्याने आयुर्मानही कमी होते. अनेकांना अकाली मृत्यूचाही धोका असतो. त्याऐवजी आहारात धान्य, शेंगा, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि काजू यांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सावधान! सतत दारू प्यायल्यानं ‘डीएनए’मध्ये होऊ शकतो वाईट परिणामजास्त मांस खाण्याचे तोटे झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार, वनस्पती-आधारित प्रोटीनपेक्षा प्राणी-आधारित प्रोटीन घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण त्यामुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. जे लोक त्यांच्या मांसाहारावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यांना हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका लक्षणीय वाढतो.
तज्ञ काय सल्ला देतात? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी तिच्या इंस्टाग्राम पेजद्वारे सांगितले की ‘हाडांच्या आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक असते, परंतु जास्त प्रमाणात प्राणी-आधारित प्रोटीन विशेषत: लाल मांस खाल्ल्याने हाडांना हानी पोहोवू शकते. त्यामुळे आपण आपल्या आहारात दुधाचे पदार्थ, मासे, चिकन आणि वनस्पती-आधारित प्रोटीनचा अधिक समावेश केला पाहिजे. तुम्ही भरपूर फळे, भाज्या आणि कडधान्ये खाऊन शरीराला आवश्यक प्रोटीन मिळवू शकता. प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबच का देतात? जाणून घ्या लाल रंगाचा आणि प्रेमाचा संबंध कॅल्शियमच्या कमतरतेचा धोका अंजली मुखर्जी यांनी सांगितले की, ‘हाय प्रोटीन डाएटचा तुमच्या हाडांवर परिणाम होतो आणि कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. लाल मांसामुळे आपले रक्त अॅसिडिक होऊ लागते आणि हाडांमधून कॅल्शियम निघून जाते आणि हाडं कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे आपण मर्यादित प्रमाणातच मांस खावे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)