मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! सतत दारू प्यायल्यानं ‘डीएनए’मध्ये होऊ शकतो वाईट परिणाम

सावधान! सतत दारू प्यायल्यानं ‘डीएनए’मध्ये होऊ शकतो वाईट परिणाम

सावधान! सतत दारू प्यायल्यानं ‘डीएनए’मध्ये होऊ शकतो परिणाम

सावधान! सतत दारू प्यायल्यानं ‘डीएनए’मध्ये होऊ शकतो परिणाम

अल्कोहोलचं सेवन ही खूप सामान्य बाब झाली आहे. त्यामुळे अनेकदा आपल्या शरीरावर होणाऱ्या वाईट परिणांमध्ये दुर्लक्ष केलं जातं. पण, ही बाब आपण गांभीर्यानं घेतली पाहिजे. कारण, दारूचे दुष्पपरिणाम मानवी शरीराच्या मुळावर म्हणजेच डीएनएवर घाव घालू शकतात.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 29 जानेवारी : दारू पिणं मानवी आरोग्यासाठी घातक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यकृत निकामी होण्यापासून ते हार्ट डिसिजेस होण्यापर्यंत, दारूचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. अल्कोहोलचं सेवन ही खूप सामान्य बाब झाली आहे. त्यामुळे अनेकदा आपल्या शरीरावर होणाऱ्या वाईट परिणांमध्ये दुर्लक्ष केलं जातं. पण, ही बाब आपण गांभीर्यानं घेतली पाहिजे. कारण, दारूचे दुष्पपरिणाम मानवी शरीराच्या मुळावर म्हणजेच डीएनएवर घाव घालू शकतात.

  नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्समधील (एनआयएमएचएएनएस) संशोधकांच्या मते, जास्त प्रमाणात दारू प्यायल्यानं डीएनएमध्ये अपरिवर्तनीय बदल होऊ शकतात. हा एक गुंतागुंतीचा बदल ठरू शकतो. आता अनेकांना वाटलं की, डीएनएमध्ये काही बदल लक्षात आल्यास दारू पिणं बंद करू आणि मग सर्व ठीक होईल. पण, असं होऊ शकणार नाही. या रिसर्चच्या लेखकांपैकी एका संशोधकानं सांगितलं की, तुम्ही अल्कोहोलचे सेवन बंद केलं तरी डीएनएमध्ये एकदा झालेला बदल कायमस्वरूपी राहू शकतो.

  'अमेरिकन जर्नल ऑफ मेडिकल जेनेटिक्स' मध्ये ऑनलाइन प्रकाशित झालेल्या स्टडीमध्ये संशोधकांनी स्पष्ट केलं की, आपलं शरीर अल्कोहोल (इथेनॉल) त्वरीत खंडित करतं. त्याच्या दोन कार्बन अणूंचं (CH3CH2 किंवा इथाइल) एकाच अणूमध्ये (CH3 किंवा मिथाइल) रूपांतर करतं. जो डीएनएसह शरीरातील इतर घटकांशी इंटरॅक्ट करू शकतो.

  मिथिलेशनमुळे जनुके स्वतःला व्यक्त करतात किंवा कदाचित हानिकारक प्रभाव पाडू शकतात. अभ्यासात असं आढळलं की, जास्त अल्कोहोल सेवनामुळे डीएनएच्या केमिस्ट्रीमध्ये झालेले बदल पूर्ववत करता येत नाहीत.

  हेही वाचा: प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबच का देतात? जाणून घ्या लाल रंगाचा आणि प्रेमाचा संबंध

   शास्त्रज्ञांच्या गटानं संशोधनाच्या उद्देशानं, 10 वर्षांपासून जास्त मद्यपान (दररोज सरासरी 10 ग्लास) करणाऱ्या व्यक्तींच्या डीएनए केमिस्ट्रीचं विश्लेषण केलं. ट्रिटमेंट घेतल्यानंतर तीन महिन्यांनी ज्यांनी दारु पिण्याचं प्रमाण कमी केलं किंवा दारु पिणं पूर्ण थांबवलं त्यांच्याही डीएनएचा अभ्यास या संशोधनात करण्यात आल्याचं या संशोधनातील एका लेखकाने सांगितलं.

  यामधून असं निदर्शनास आलं की जास्त मद्यपान करणाऱ्यांमधील मिथिलेशन प्रक्रियेमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तीन महिने दारूचं सेवन बंद केल्यानंतरही ही स्थिती अशीच राहिली. अल्कोहोलच्या मेटॅबॉलिझमशी थेट जोडलेले दोन जीन्स, जास्त दारू पिणाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात मिथाइलेटेड होतात. त्यांनी दारू पिणं बंद केल्यानंतरही ही स्थिती आहे तशीच राहिली. त्यांना असंही आढळलं की, जास्त मद्यपान करणार्‍यांनी मद्यपान बंद केलं तरीही, त्यांच्या शरीरातील मिथिलेशन प्रक्रिया न पिणार्‍यांच्या पातळीवर परत येत नाही. याचा अर्थ असा होतो की अल्कोहोलमुळे डीएनएमध्ये झालेले रासायनिक बदल तात्पुरते नाहीत.

  याव्यतिरिक्त, शास्त्रज्ञांना असंही आढळलं की, ज्यांनी लहान वयात मद्यपान करण्यास सुरवात केली होती त्यांच्या डीएनएमध्ये अधिक तीव्रपणे बदल झाले आहेत. याचा अर्थ असा होतो की, कमी वयात मद्यपान सुरू केल्यास मेंदूशी संबंधित जनुकांसह शरिरातील विविध जनुकांवर परिणाम होऊ शकतो. याचा मेंदूचा विकास आणि परिपक्वतेवर खोल परिणाम होऊ शकतो. हे परिणाम आयुष्यभर टिकून राहू शकतात.

  First published:

  Tags: Alcohol, Health